मुलगी झाल्यानं छळ, रात्रभर टीव्ही सुरु राहिल्याचं निमित्त, पतीनं थेट पत्नीचा गळा घोटला, पुण्यातील धक्कादायक घटना

राज्यातील महिलावरींल अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.

मुलगी झाल्यानं छळ, रात्रभर टीव्ही सुरु राहिल्याचं निमित्त, पतीनं थेट पत्नीचा गळा घोटला, पुण्यातील धक्कादायक घटना
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 6:51 PM

पुणे: राज्यातील महिलावरींल अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्रभर टीव्ही सुरू ठेऊन का झोपलीस? या कारणावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योगेश जाधव यानं त्याची पत्नी चांगुणा जाधव हिचा खून केल्याचं समोर येताच गावामध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

पुण्याच्या मावळ तालुक्यात चांदखेड गावात ही धक्कादायक घटना घडली. चांदखेडमधील चांगुणा जाधव हिचा पती योगेश जाधव यानं टीव्ही चालू ठेऊन झोपली या कारणावरुन पत्नीचा खून केला. ही घटना समोर येताच आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.

मुलीचा जन्म झाल्याची किनार

योगेश जाधव आणि चांगुणा जाधव या दांम्पत्यानं सहा महिन्यापूर्वी एका मुलीला जन्म दिला होता. पत्नीच्या पोटी मुलगी जन्मल्याची देखील या खून प्रकरणाला किनार असल्याचा अंदाज आहे.चांदखेड येथील चांगुणा जाधव असं मृत महिलेचं तर आरोपी पतीचे योगेश जाधव असं नाव असून सहा महिन्यांपूर्वीच या दाम्पत्याने मुलीला जन्म दिला.पण मुलगी जन्मली म्हणून योगेश पत्नीचा नेहमीच छळ करत होता.

रात्रभर टीव्ही सुरु राहिल्याचं निमित्त

योगेश जाधव पत्नी चांगुणा जाधव हिचा छळ करत होता. हे सुरु असतानाच अशात रात्रभर टीव्ही सुरूच राहिल्याचं कारण योगेशला मिळालं आणि त्याने तिचा गळा घोटून जीव घेतला.

पोलिसांकडून तपास सुरु

मावळ तालुक्यातील चांदखेड गावातील खून प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस तातडीनं गावात दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन तपास सुरु केला आहे. तर, या प्रकरणी आरोपी योगेश जाधव याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पुण्यात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुण्यात 25 वर्षीय महिलेवर घरात घुसून चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींना दत्तवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नराधमांना बेड्या, महिला रुग्णालयात दाखल

“घटनेतील आरोपी पीडित महिलेसह आम्हाला आढळून आले. आम्ही आरोपींना ताब्यात घेतलं. तसंच महिलेला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. नराधमांवर तात्काळ गुन्हे दाखल केले आहेत”, अशी माहिती दत्तवाडी पोलिसांनी दिली आहे.

इतर बातम्या:

रडत-रडत सुसाईड VIDEO काढला, छळाची ‘आपबिती’ सांगितली, ठाण्यात महिलेची आत्महत्या

‘कार हळू चालव’ म्हटल्याने डोक्यात गेला राग, लाथाबुक्क्यांनी मारलं, रक्तबंबाळ व्यक्तीचा अखेर मृत्यू

चारित्र्यावर संशय, पत्नीचं गुप्तांग सुई-दोऱ्याने शिवलं, ‘सर्किट’ पतीच्या विकृतीचा कळस

Pune Maval Chandkhed village accused Yogesh Jadhav murder his wife due to TV on whole night

'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.