AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Accident : कारच्या फ्रंट कॅमेऱ्यात थरारक अपघात कैद! ओव्हरटेकींगचा नाद बाईकस्वार तरुणाला अंगलट, पाहा व्हिडीओ

Pune Maval Accident Video : हिरोहोंडा बाईकवरुन बाळू शिळवणे हा तरुण जात होता. एका कंटेनरला तो ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्ना होता. रस्त्याच्या पूर्णपणे बाजूला आलेली त्याची बाईक तो पुन्हा ओव्हरटेक करुन डाव्या लेनमध्ये घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होता.

Pune Accident : कारच्या फ्रंट कॅमेऱ्यात थरारक अपघात कैद! ओव्हरटेकींगचा नाद बाईकस्वार तरुणाला अंगलट, पाहा व्हिडीओ
मावळमध्ये थरारक अपघात...Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 22, 2022 | 8:35 AM
Share

पुणे : राज्यात अपघाताचं (Road Accident) सत्र सुरु आहे. अशातच हे अपघात घडण्याला कारण वाहनचालकांचा बेशिस्तपणा आहे, हे अधोरेखित करणारी घटना समोर आली आहे. कारच्या फ्रंट कॅमेऱ्यात (Pune accident News) एक थरारक अपघात कैद झाला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात एक बाईकस्वार चुकीच्या लेनमध्ये येतो. समोरुन भरधाव वेगाने कार येतेय, हे पाहूनही ओव्हरटेक करण्याचा मोह काही कारचालकाला आवरत नाही. अखेर बाईक कारच्या बोनेटला जोरदार धडकते आणि काळजाचा ठोका चुकवणारी ही दृश्य कॅमेऱ्यात कैद होतात. या अपघाताने दुचाकीस्वारांचा बेशिस्तपणा आणि अतिउत्साह जीववार बेतू शकतो, हे ठळकपणे अधोरेखित केलंय. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये (Maval Accident) कंटेनरला ओव्हर टेक करण्याच्या नादात बाईक समोरुन येणाऱ्या कारला धडकली. अपघाताची ही घटना कॅमरात कैद झालीय. तळेगाव-चाकण रोडवर हा अपघात झाला. कारच्या फ्रंट कॅमेऱ्यात अपघाताची काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं कैद झालीत.

पाहा व्हिडीओ :

या अपघातात बाळू गेणू शिळवणे हा दुचाकीचालक गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसंच दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे दृश्य बघता केवळ दैव बलवत्तर असल्यानेच तो वाचला असल्याचं पाहायला मिळतंय.

हिरोहोंडा बाईकवरुन बाळू शिळवणे हा तरुण जात होता. एका कंटेनरला तो ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्ना होता. रस्त्याच्या पूर्णपणे बाजूला आलेली त्याची बाईक तो पुन्हा ओव्हरटेक करुन डाव्या लेनमध्ये घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होता. पण इतक्यात समोरुन येणाऱ्या कारच्या वेगाचा त्याला अंदाज आला नाही. डाव्या लेनमध्ये बाईक आणण्याच्या आधीच समोरुन येणाऱ्या कारच्या उजव्या बाजूला त्याच्या बाईकचा धक्का लागतो आणि दुचाकीस्वार बाळू शिळवणे हा तरुण जागीच कोसळतो.

कंटेरनच्या खाली येऊन दुचाकीस्वार चिरडला जाण्याचीही भीती असतो. पण नशीब बलवत्तर म्हणून हा तरुण अगदी थोडक्यात बचावलाय. पण पावसामुळे रस्ता निसरडा झालेला होता. त्यात कारला धडक देऊन खाली कोसळल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाला खरचटलंय. पण त्याचा जीव वाचलाय. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या व्हिडीओमध्ये रस्ते अपघातांची दाहकता अधोरेखित केलीय.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.