Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात, 5 जणांवर काळाचा घाला

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मोठा अपघात! पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या अर्टिंगा कारचा चक्काचूर

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात, 5 जणांवर काळाचा घाला
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 8:24 AM

रायगड : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (Pune Mumbai express Highway Accident) आज पहाटेच्या सुमारास पुन्हा एक मोठा अपघात झाला. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या अर्टिगा कारच्या (Ertiga Car) चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि भीषण अपघात घडला. या अपघातात 5 जण ठार झाले आहेत. तर तिघे जखमी आहेत. अर्टिगा कारचा अपघात इतका भीषण (Road Accident News) होता की धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारच्या समोरील बाजूस जबर फटका अपघातात बसला होता.

अर्टिगा कार ढेकू गावच्या हद्दीत किलोमीटर 37.00 याठिकाणी आली असता चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारची अज्ञात वाहनाला मागून धडक बसली. धडक एवढी जबरदस्त होती की कारमधून प्रवास करणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला किरकोळ जखमी झाली असून चार जण गंभीर जखमी झालेत.

कारमधील हे सर्व प्रवासी हे अर्टिगा ह्या चारचाकी वाहनामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाले होते. या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतुकीवरही अल्पसा परिणाम झाला होता.

जखमींना उपचारासाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालय येथे नेण्यात आले. त्यादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. सध्या चालक आणि इतर दोघाजणांवर उपचार सुरू आहेत

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे :

१) अब्दुल रहमान खान,३२ वर्षे, घाटकोपर २) अनिल सुनिल सानप, ३) वसीम साजिद काझी, रा.राजापूर, जि. रत्नागिरी ४) राहुल कुमार पांडे, वय-३० वर्षे, फ्लॅट न.-६०५, रिद्धेश्वर हौ. सो., कामोठे. नवी मुंबई ५) आशुतोष नवनाथ गांडेकर, २३ वर्षे, ५, अशोक धर्मा चाळ, म्हातारपाडा, अंबोली, अंधेरी(प), मुंबई

अपघातातील जखमींची नावे :

१) मच्छिंद्र आंबोरे वय ३८ वर्ष(चालक) २) अमीरउल्ला चौधरी ३) दिपक खैराल

किरकोळ जखमीः-

१) अस्फीया रईस चौधरी, २५ वर्षे. कुर्ला, मुंबई

दरम्यान, पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच लगेचच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना तातडीन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र चार जणांचा जागीच जीव गेला होता. त्यानंतर पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कार बाजूला हटवली.

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.