“एक फूल दो माली”, प्रेम प्रकरणातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला उडवले

Pune Crime News: एक्स बॉय फ्रेंड निलेश तिला भेटायला येत आहे, यामुळे सुशील त्याचा काटा काढण्याची तयारी केली. निलेश जेव्हा भेटायला आला तो युवतीशी बोलत होता. त्यावेळी सुशीलने चारचाकी गाडीने निलेशला उडवले. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एक फूल दो माली, प्रेम प्रकरणातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला उडवले
पिंपरी चिंचवडमधील अपघात
Follow us
| Updated on: May 28, 2024 | 10:42 AM

“एक फूल दो माली” हा 1970 च्या दशकातील चित्रपट. त्या काळात त्या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. देवेंद्र गोयल दिग्दर्शित हा हिंदी चित्रपट संपत लाल पुरोहित यांच्या दो कदम आगे या पुस्तकावर आधारित आहे. एकाच मुलीवर दोघांचे प्रेम होते, अशी त्या चित्रपटातील कथा होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड भागात घडली. परंतु त्या मुलीच्या प्रेमासाठी दुसऱ्या तरुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न त्या प्रेमवीराने केला. या प्रकरणातील तरुण अपघातात गंभीर जखमी झाली आहे. दुसरीकडे पोलिसांनी अपघात घडवणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

अपघातात तरुण गंभीर जखमी

पिंपरी- चिंचवडमधील एक प्रेम प्रकरण उघड झाले आहे. निलेश शिंदे आणि सुशील काळे हे दोन्ही एकाच मुलीवर प्रेम करत होते. या प्रेमप्रकरणामुळे एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चार चाकी गाडीने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास टेल्को रोड यशवंत नगर या ठिकाणी घडलेली आहे. या घटनेमध्ये निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुशील भास्कर काळे या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांची एकच गर्लफ्रेंड

निलेश शिंदे आणि सुशील काळे या दोघांची एकच गर्लफ्रेंड आहे. परंतु सध्या त्या तरुणीने निलेश ऐवजी सुशील काळे याच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले आहे. आता ती निलेशपासून लांब झालेली आहे. निलेश तिला त्रास देत होत असल्याचे ती सांगत होती. निलेशला तिच्या आणि सुशीलच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरा तिने त्या तरुणीला भेटण्यास बोलवले. त्या तरुणीने ही माहिती सुशील याला दिला.

हे सुद्धा वाचा

एक्स बॉय फ्रेंड निलेश तिला भेटायला येत आहे, यामुळे सुशील त्याचा काटा काढण्याची तयारी केली. निलेश जेव्हा भेटायला आला तो युवतीशी बोलत होता. त्यावेळी सुशीलने चारचाकी गाडीने निलेशला उडवले. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.