दहावी पासच्या सर्टिफिकेटला 60 हजार रुपये, पुणे पोलिसांनी सिनेस्टाईल मुसक्या आवळल्या

लबाडीला लगाम लावणं आजच्या घडीला जास्त आवश्यक आहे. कारण अनेक जण खूप मेहनत करुन यशस्वी होतात. यशाला शॉर्टकट नसतं, असं म्हणतात. पण तरीही शॉर्टकट मिळवण्याचा प्रयत्न केला किंवा लोकांना फूस लावून लुबाडण्याचा प्रयत्न केला तर त्याची शिक्षा भोगावीच लागते. पुण्यात असाच काहीसा प्रकार समोर आलाय.

दहावी पासच्या सर्टिफिकेटला 60 हजार रुपये, पुणे पोलिसांनी सिनेस्टाईल मुसक्या आवळल्या
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 4:47 PM

पुणे : दहावी-बारावीच्या परीक्षा या आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असल्याचं मानलं जातं. शालेय शिक्षणाच्यावेळी प्रत्येक विद्यार्थी आपल्याला इंजिनियर व्हायचं किंवा डॉक्टर व्हायचं अशी वेगवेगळी स्वप्न पाहतात. त्यानुसार विद्यार्थी हे दहावी नंतर सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स अशा वेगवेगळ्या शाखांमधून 11 वी पासूनचं शिक्षण सुरु करतात. तर काहीजण वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित डिप्लोमा कोर्स करुन आपल्या उपजिवेकेसाठी नोकरी शोधतात किंवा पुढचं शिक्षण घेतात. दहावी-बारावीपर्यंतचं शिक्षण सध्याच्या घडीला अनिवार्य आहे. कारण सरकारी नोकरी असेल किंवा इतर नोकरी असेल त्यासाठी कमीतकमी दहावीपर्यंतचं शिक्षणाची अट असते. पण पुण्यात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे.

पुण्यात एका तरुणाला नोकरी मिळवायची होती. त्यासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीचे अर्ज दाखल करत होता. अनेक ठिकाणी तो प्रयत्न करत होता. पण हा तरुण दहावी उत्तीर्ण नव्हता. त्यामुळे त्याला नोकरी मिळवण्यासाठी अडचणी येत होत्या. यावर पर्याय तो शोधत होता. या दरम्यान त्याला एकाने पत्ता दिला आणि संबंधित ठिकाणी बनावट प्रमाणपत्र बनवून मिळतं. या प्रमाणपत्रात दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असल्याचा उल्लेख असतो. ते बनावट प्रमाणपत्र असलं तरी तुम्हाला नोकरी मिळेल, असं आश्वासन संबंधित तरुणाला देण्यात आलं.

तरुणाने आरोपींना 60 हजार दिले

तरुणाने फोन नंबर आणि पत्ता मिळवत संबंधित आरोपींशी संपर्क केला. आरोपींनी त्याला 60 हजार रुपयात आपण प्रमाणपत्र बनवून देतो असं सांगितलं. आपल्याला नोकरी मिळेल या आशेने या तरुणाने आरोपींना 60 हजार रुपये दिले. तरुणाला प्रमाणपत्र मिळालं. त्याने एका ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला. तिथे त्याने दहावी-बारावीचं प्रमाणपत्रही जमा केलं. पण इथेच तो फसला. त्याच्या कागदपत्रांची पडताळणी करताना तो अडकला. त्याच्यावर कायदेशीरपणे कारवाई करण्याचं ठरलं.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी आरोपींना कसं हेरलं?

संबंधित प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं. पुणे पोलिसांनी आधी तरुणाला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली. या तरुणाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपींना बेड्या ठोकल्या. या आरोपींचा जबाब नोंदवल्यानंतर आरोपींनी तरुणाकडून 60 हजार रुपये घेत बनावट प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

पोलिसांनी या प्रकरणी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. यापैकी संदीप कांबळे हा मुख्य आरोपी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपी हा दहावीच्या बोर्डाचे सर्टिफिकेट बरोबर मार्कशीट आणि स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेट देखील देत होता. आरोपी संदीपने अनेक लोकांना पैसे घेऊन फसविल्याचे पोलीस चौकशीत उघड झालंय. राज्यातील 35 तरुणांना फसवल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.