AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime : पुणे पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन; साडेतीन हजार गुंडांची झाडाझडती

शहरात लुटमार, घरफोड्या तसेच वाहन चोऱ्या आणि हाणामाऱ्यांच्या घटना ‌वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी पुणे पोलिसांकडून अचानक हे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले होते. शनिवारी रात्री शहरात अचानक मोहिम राबवत साडेतीन हजार गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली आहे.

Pune Crime : पुणे पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन; साडेतीन हजार गुंडांची झाडाझडती
उदयपूर हत्याकांडानंतर प्रशासन सतर्क
| Edited By: | Updated on: Jun 12, 2022 | 7:50 PM
Share

पुणे : शहरात कोम्बिंग ऑपरेशन (Combing Operation) राबवत पुणे पोलिसां (Pune Police)नी साडे तीन हजार गुन्हेगारांची झाडाझडती घेतली आहे. या कारवाईत साडेतीन हजारांपैकी 685 गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात (Detained) देखील आले आहेत. तसेच पोलिसांनी या दरम्यान दोन पिस्तुल, काडतुसे, शस्त्रासाठा जप्त केले आहे. तर, चंदननगरमधील हुक्का पार्लरवरही कारवाई करण्यात आली आहे. अचानक होत असलेल्या या कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांच्या मनात धडकी भरली आहे. शहरात लुटमार, घरफोड्या तसेच वाहन चोऱ्या आणि हाणामाऱ्यांच्या घटना ‌वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी पुणे पोलिसांकडून अचानक हे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले होते. शनिवारी रात्री शहरात अचानक मोहिम राबवत साडेतीन हजार गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाया

शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी ठोस पावले उचलली आहेत. सीआरपीसी कायद्याप्रमाणे 80 आरोपींविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई पुणे पोलिसांनी केली आहे. गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी 14 तडीपार गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. शहरातील 391 हॉटेल्स, ढाबे, लॉजेस तसेच एसटी स्टँड, रेल्वे स्थानक, निर्जन ठिकाणे चेक करण्यात आले. तसेच 903 वाहने चेक करून कारवाई करण्यात आली. वाहतूक विभागाने 492 संशयित वाहन चालकांना चेक करून 276 दुचाकींवर, 19 तीन चाकी व 197 चारचाकींवर कारवाई केली.

फूड इन्स्पेक्टर असल्याचे भासवून रेस्टॉरंट चालकाला लाखोंचा गंडा

एफएसएसएआय अधिकारी असल्याचा फोन करून रेस्टॉरंट मालकाला तुमच्या रेस्टॉरंटमधील जेवणामुळे एका महिलेला विषबाधा झाल्याचे सांगत केसमध्ये अडकविण्याची धमकी देऊन 4 लाख 42 हजार 500 रुपयांना ऑनलाइन गंडा घालण्यात आला. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नामांकित रेस्टॉरंट कांचन व्हेजला 4 लाख 42 हजार 500 रुपयांना ऑनलाइन गंडा घातला. याप्रकरणी प्रसाद दत्तात्रय कांचन यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune police conducted a combing operation and arrested 685 criminals)

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.