AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील CCTV मध्ये दिसले 12 हल्लेखोर, आंदेकर पळताच हल्लेखोरांनी फायरींग केली सुरु

Pune Vanraj Aandekar Murder: वनराज आंदेकर हत्येमागे परिसरातील नाना पेठेतील सूरज ठोंबरे याचाही हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पुण्यातील नाना पेठेत आंदेकर टोळीच्या गुंडांनी सूरज ठोंबरे टोळीतील दोघांवर हल्ला केला होता, त्यात दोन जण ठार झाले होते.

वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील CCTV मध्ये दिसले 12 हल्लेखोर, आंदेकर पळताच हल्लेखोरांनी फायरींग केली सुरु
Vanraj Aandekar Murder
| Updated on: Sep 02, 2024 | 11:57 AM
Share

Vanraj Aandekar Murder : पुणे शहरात दहशत निर्माण करणारी घटना पुन्हा एकदा घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली. शहरातील गजबजलेल्या भागात हल्लेखोर चार ते पाच गाड्यांवरुन आले अन् एखाद्या चित्रपटाप्रमाणे वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला सुरु केला. वनराज आंदेकर हल्लेखोरांना पाहताच पळू लागले. परंतु गाडीवरुन उतरत हल्लेखोरांनी गोळीबार सुरु केला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात 12 हल्लेखोर दिसत आहे. त्यात काही जणांकडे शस्त्र आहे.

पुणे पोलिसांनी या हत्या प्रकरणातील सीसीटीव्ही फुजेट जारी केले आहे. त्यात पाच ते सहा गाड्यांवर 12 युवक सोबत आलेले दिसत आहे. ते गाडीवरुन उतरुन वनराज आंदेकर यांच्या दिशेने जाऊ लागले. आपल्यावर हल्ला होणार हे कळताच आंदेकर जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्यावेळी एका हल्लेखोरांची गोळी त्यांच्या कानाजवळून गेली. आंदेकर रक्तबंबाळ झाल्यानंतर हल्लेखोरांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर घटनास्थळावरुन फरार झाले. चित्रपटात ज्या पद्धतीने गुंड हल्ला करुन पसार होतात, तिच पद्धत हल्लेखोरांची दिसली.

नाना पेठेत आंदेकर टोळीचे वर्चस्व

वैयक्तिक वैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. कारण वनराज आंदेकरच्या टोळीचा नाना पेठ परिसरात बराच वावर आहे. तो गुंड बंडू आंदेकर याचा मुलगा होता. घरगुती वादातून घडलेल्या या खुनाच्या घटनेला बंडू आंदेकर यांचा जावई गणेश कोमकर जबाबदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही वर्षांपूर्वी गणेश कोमकर याने शिवसेनेचे शहरप्रमुख रामभाऊ पारेख यांच्यावरही ॲसिड हल्ला केल्याचा आरोप केला होता.

गुंड सूरज ठोंबरे याचाही हात?

वनराज आंदेकर हत्येमागे परिसरातील नाना पेठेतील सूरज ठोंबरे याचाही हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पुण्यातील नाना पेठेत आंदेकर टोळीच्या गुंडांनी सूरज ठोंबरे टोळीतील दोघांवर हल्ला केला होता, त्यात दोन जण ठार झाले होते. आता वनराज आंदेकर यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे पुण्यातील गुन्हेगारी टोळीशी संबंधित वाढत्या कारवायांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कोथरूडमध्ये गँगस्टर शरद मोहोळ याचीही भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.