डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळल्यानं खळबळ, गुन्हे दाखल

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळल्यानं खळबळ, गुन्हे दाखल
hidden cam
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 9:44 PM

पुणे : डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे (Hidden Cameras) आढळल्यानं एकच खळबळ उडालीय, त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारती विद्यापीठातील कॅम्पसमध्ये राहणाऱ्या 31 वर्षीय डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळलेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Pune Sensation After Doctors Found Hidden Cameras In a Women Bedroom And Bathroom, Filing a Crime)

बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावल्याचे आले निदर्शनास

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला या डॉक्टर असून, भारती विद्यापीठ कॅम्पस परिसरात असणाऱ्या कॉर्टरमध्ये त्या राहतात. सहा जुलै रोजी त्या सकाळी 8:45 वाजता नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास त्या घरी परत आल्या. यावेळी त्यांना बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले असल्याचे निदर्शनास आले.

‘त्या’ अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, अज्ञात इसमाने बनावट चावीच्या सहाय्याने लॉक उघडून आतमध्ये प्रवेश करून त्यांचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावून फिर्यादीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याने अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

कपडे बदलताना तरुण मुलींची व्हिडीओ रेकॉर्डिंग, अंधेरीत टेलरला अटक

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील अनेक बड्या मॉलमध्ये आणि दुकानातील लेडीज ट्रायल रुम आणि बाथरुममध्ये छुपे कॅमेरे (spy camera in ladies changing room) सापडले होते. असाच एक प्रकार अंधेरीतील लोखंडवालामध्ये समोर आला होता. अंधेरीत टेलरच्या दुकानात लेडीज ट्रायल रुममध्ये छुप्या कॅमेराद्वारे चित्रीकरण केलं जात होते. या धक्कादायक घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण होते.

संबंधित बातम्या

BMC च्या दोन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा घोटाळा, पत्नीच्या नावे कंपनी बनवून कोट्यवधींची कंत्राटे मिळवली

घरात एकाच खाटेवर रात्री सोबत झोपले, पहाटे उठल्यानंतर पती रक्ताच्या थारोळ्यात, मध्यरात्री काय घडलं? पत्नीला थांगपत्ताच नाही

Pune Sensation After Doctors Found Hidden Cameras In a Women Bedroom And Bathroom, Filing a Crime

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.