Pune News : पुणे दशतवादी तपास प्रकरण एनआयकडे, ATSकडून का गेला NIAकडे तपास?

Pune Crime News : पुणे शहरात दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या दहशतवाद्यांची योजना उघड झाली होती. आता या प्रकरणाचा तपास एटीएसकडून राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्यात आला आहे. त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

Pune News : पुणे दशतवादी तपास प्रकरण एनआयकडे, ATSकडून का गेला NIAकडे तपास?
NIA
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 11:08 AM

प्रदीप कापसे, पुणे | 8 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात १८ जुलै रोजी पुणे पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. एका मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात सापडलेले हे दोघे दहशतवादी निघाले. राष्ट्रीय तपास संस्थेच्या मोस्ट वॉटेंड दहशतवाद्यांच्या यादी ते होते. इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास एटीएसकडे देण्यात आला. त्यानंतर या दोघांना मदत करणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण आणि सिमाब नसरुद्दीन काझी यांनाही एटीएसने अटक केली. तसेच मुंबईच्या कारागृहात असलेल्या झुल्फीकार अली बडोदावाला यालाही अटक केली.

तपास एटीएसकडून आता एनआयएकडे

पुणे दहशतवादी तपास आता एटीएसकडून एएनआयकडे देण्यात आला आहे. या दहशवाद्यांचे इसिस आणि अल सुफा या दहशवादी संघटनांशी असलेल्या संबंधामुळे हा तपास एनआयएकडे दिला आहे. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रकरणात डॉ अदनान अली बडोदेवाला याने दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याचे तपासात समोर आले आहे. बडोदेवाला याला इसिसशी संबंधामुळे एनआयएने यापूर्वी अटक केली आहे. तो मुंबई येथील आर्थररोड कारागृहात आहे.

दहशतवाद्यांकडून एटीएसला आतापर्यंत काय मिळाले

  • दहशतवाद्यांनी पुणे, कोल्हापूर आणि सातारा जंगलात जाऊन बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे तपासात उघड.
  • बडोदावाला याने दोन्ही दहशतवाद्यांच्या मदतीने इतरांना बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी शिबीर आयोजित केले होते.
  • दहशतवादी कारवायांसाठी राज्यातील तरुणांना आकर्षित करण्यासाठी गट सक्रीय असल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • दोघे दहशवाद्यांकडील गॅझेटमधील माहितीनुसार त्यांचे इसिससी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • बॉम्ब बनवण्यासाठी अनेक साहित्य या दोघे दहशतवाद्यांनी आणले होते. ते जप्त करण्यात आले. त्यांनी रसायने अन् स्फोटके खरेदी केली होते.
  • दोघे दहशतवादी जगभरात करण्यात येत असलेल्या दहशवादी घटनांचा अभ्यास करत होते.
  • शहरातील संवेदनशील भागाची रेकी केली, ड्रोनने फोटो घेतले.
  • दहशतवाद्यांकडे असलेल्या गाडीतून पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आली.
  • दोघे दहशतवादी दीड वर्षांपासून पुण्यातील कोंडवा भागात राहत होते.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.