वनराज आंदेकर यांना सख्या बहिणींनीच संपवल्याचा संशय, मेहुणे अन् बहिणींना अटक
Pune Vanraj Aandekar Murder: वनराज आंदेकर आणि त्यांचा चुलत भाऊ नाना पेठेत उभे होते. त्यावेळी हल्लेखोर आले आणि त्यांनी गोळीबार सुरु केला. त्यामध्ये आंदेकर जखमी झाले. त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
Pune Vanraj Aandekar Murder: पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ माजली आहे. एकीकडे वनराज आंदेकर हत्या हा गँगवार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु पुणे पोलिसांना हे प्रकरण कौटुंबिक वाद असल्याचा संशय आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर यांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि दोन मेहुण्यांना अटक केली आहे. पोलिसांनी चार जणांना अटक केल्याची माहिती पुणे शहर सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली.
कौटुंबिक वादातून हत्या
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवारी पुण्यातील नाना पेठेत हत्या झाली. रात्री नऊच्या सुमारास वनराज यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणी पुणे पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यामध्ये वनराजच्या सख्या दोन बहिणी आणि मेहुण्यांचा समावेश आहे. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या चौघांना अटक
पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर याचे मेहुणे जयंत कोमकर, गणेश कोमकर आणि बहिणी संजीवनी कोमकर अन् कल्याणी कोमकर यांना अटक केली आहे. या प्रकरणावर ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना पुणे शहर सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले की, वनराज आंदेकर आणि त्यांचा चुलत भाऊ नाना पेठेत उभे होते. त्यावेळी हल्लेखोर आले आणि त्यांनी गोळीबार सुरु केला. त्यामध्ये आंदेकर जखमी झाले. त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, वनराज आंदेकर हत्या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जारी केले आहे. त्यात एकूण १२ हल्लेखोर चार ते पाच गाड्यांवर आल्याचे दिसत आहे. गाडीवरुन उतरताच वनराज आंदेकर यांच्या दिशेने त्यांनी गोळीबार सुरु केला. आंदेकर जखमी होताच त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
हे ही वाचा…