पुण्यात थरार, गर्दी बघत होती, आरोपी कोयत्याने वार करत होते, ती एकटी लढत होती

Pune Crime News | पुणे शहरात भर रस्त्यात कोयत्याने धुडघूस घालणाऱ्या आरोपींना एकट्या महिला पोलीस हवालदाराने पकडले. रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली असताना तिला कोणी मदत केली नाही. यानंतर तिने एका गुंडाला पकडून ठेवले. त्यानंतर २० मिनिटांत इतर आरोपींना अटक झाली.

पुण्यात थरार, गर्दी बघत होती, आरोपी कोयत्याने वार करत होते, ती एकटी लढत होती
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 10:39 AM

पुणे, दि.29 डिसेंबर | पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगार भर रस्त्यात कोयता काढून दहशत निर्माण करतात. पुणे पोलिसांकडून कोयता गँगवर कारवाई केली जात असल्यानंतर कोयता गँगचा धुडघूस सुरुच असतो. पुणे वडगाव शेरी परिसरात गुन्हेगारीची मोठी घटना घडली. या ठिकाणी टोळक्याने कोयता, दगड आणि विटांनी हल्ला सुरु केला होता. रात्री अकरा वाजता भर रस्त्यात होत असलेल्या या प्रकारामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. परंतु गर्दीतील कोणीही मध्ये पडायला तयार झाले नाही. त्याचवेळी पोलिस ठाण्यातील ड्युटी संपवून महिला पोलिस हवालदार सीमा वळवी घरी जात होती. मत त्यांनी कोणताही विचार न करता रस्त्यावर उतरून आपले काम सुरु केले. पोलीस येईपर्यंत गुंडाला पकडून ठेवले. वळवी यांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे.

काय झाला प्रकार

वडगाव शेरी येथील दिगंबर नगरात रस्त्यावर रात्री अकरा वाजता वाद सुरु होता. काही जण एकमेकांना मारहाण करत होते. दगड, विटांचा मारा होत होतो. त्याचवेळी चंदननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदार सीमा वळवी ड्यूटी संपवून घरी जात होत्या. गर्दी पाहून त्या थांबल्या. आपल्या कराऱ्या आवाजात मारहाण करणार्‍यांना दरडावले. त्या वेळी काही जणांनी घटनास्थळावरुन पळ काढला. परंतु एका आरोपीने कोयता काढला. त्याने कोयत्याने दुसऱ्या तरुणावर वार केले. एकट्या असलेल्या वळवी सर्वांना रोखण्याचा प्रयत्न करत होत्या. तसेच नंतर आरोपींना पकडता यावे म्हणून एका हाताने मोबाईलद्वारे चित्रीकरण करत होत्या. या वेळी एकट्या लढणाऱ्या वळवी यांच्या मदतीला कोणी आले नाही.

हे सुद्धा वाचा

दोन तरुण जखमी

एका आरोपीने कोयत्याने वार केल्यामुळे दोन जण जखमी झाले. वळवी यांनी धावत जाऊन एका आरोपीला पकडले. त्यानंतर नियंत्रण कक्षाला फोन केला. चंदननगर पोलिस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर काही वेळेत पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. अवघ्या 20 मिनिटांत पोलिसांनी मारहाण करणार्‍या आरोपींना बेड्या ठोकल्या. भर रस्त्यावर धुडघूस घालणारे आरोपी एका महिला पोलीस हवालदाराच्या साहसामुळे पकडले गेले. यामुळे या कारवाईचे कौतुक होते आहे. सीमा वळवी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या गेल्या.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.