AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri Crime| कामाचे आगाऊ पैसे देण्यास नकार देणे मालकाला पडले महागात ; कामगाराने पेटवले थेट दुकान

कामाचे आगाऊ पैसे देण्यास मालकाने नकार दिल्याने रागावलेल्या कामगाराने थेट दुकानालाचा आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. पिंपरीमधील थेरगाव येथे ही घटना घडली आहे.

Pimpri Crime| कामाचे आगाऊ पैसे देण्यास नकार देणे मालकाला पडले महागात ; कामगाराने पेटवले थेट दुकान
फरार आरोपी नगरसेवक संजय तेलनाडे अडीच वर्षांनी गजाआड
| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 10:48 AM
Share

पिंपरी – दुकानात कामाचे आगाऊ पैसे देण्यास नकार देणे दुकान मालकाला चांगलेच महागात पडले आहे. कामाचे आगाऊ पैसे देण्यास मालकाने नकार दिल्याने रागावलेल्या कामगाराने थेट दुकानालाचा आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. पिंपरीमधील थेरगाव येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी कामगारावर एफआयआर दाखल करत अटक केली आहे. याबाबत दुकान मालक शंकर लक्ष्मण सोनावणे ( वय ५१ , नखातेनगर , थेरगाव ) यांनी आरोपी प्रकाश शंकरराव सोनकांबळे (बिदर , जि, भालकी ) यांच्या विरोधात वाकड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

…तर झाले असे फिर्यादी सोनावणे यांच्या मुलाचे थेरगावमधील दत्तनगर येथे ओमसाई कुशन नावाचे दुकान आहे. या दुकानात आरोपी प्रकाश सोनकांबळे कामगार म्हणून काम करत होता. प्रकाशने मालक सोनावणे यांना कामाचे आगाऊ पैसे मागितले मात्र सोनावणे यांनी पैसे देण्यास नकार दिला. मालकाने आपल्याला पैसे दिले नसल्याचा राग प्रकाशच्या मनात होता. या रागातूनच त्याने शिवीगाळ करत संधी मिळताच दुकानाला आग लावली.

बाजूच्या दुकानांचेही नुकसान आरोपी प्रकाश सोनकांबळेने लावलेल्या आगीमुळे बाजूच्या दुकानांचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. कामगाराच्या या कृत्यामुळे दुकानाचे मोठे नुकसान झाले असून त्याचा फटका इतर दुकानांही बसला आहे.  यापूर्वीही पिंपरीमध्ये मालकाने काम वरून काढून टाकल्याचा राग मनात धरत , वाहन चालकाने थेट मालकाची चारचाकीचा पेटवून दिली होती. या घटनेचा व्हिडिओ ही व्हायरल झाला होता.

corporator Avinash Bagwe | काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना उच्च न्यायालयाचा दणका; नगरसेवकपद केले रद्द

प्रेयसीची हत्या, दगड बांधून मृतदेह खाडीत टाकला, विरारमधील खुनाचा पाच दिवसात उलगडा

अवकाळी पावसात 2 हजार जनावरे दगावली, राज्य सरकारकडून पशूपालकांना मिळणार आर्थिक मदत

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.