Satish Wagh : भाजप आमदाराच्या मामाला संपवण्याचं कटकारस्थान उघड, सतीश वाघ यांच्या हत्येचं गूढ उकललं, इतक्या लाखांची सुपारी अन्..

पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्येच्या घटनेचा उलगडा केला आहे. पोलिसांनी 450 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली गाडीही जप्त केली आहे. आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Satish Wagh : भाजप आमदाराच्या मामाला संपवण्याचं कटकारस्थान उघड, सतीश वाघ यांच्या हत्येचं गूढ उकललं, इतक्या लाखांची सुपारी अन्..
भाजप आमदाराच्या मामाला संपवण्याचं कटकारस्थान उघड, सतीश वाघ यांच्या हत्येचं गूढ उकललं
Follow us
| Updated on: Dec 11, 2024 | 3:38 PM

पुण्यातील भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्येच्या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. पोलिसांचे जवळपास 16 विविध पथकं या प्रकरणात तपास करत होते. पोलिसांनी तपासादरम्यान एकाच दिवसांत तब्बल 450 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. अखेर या तपासात पोलिसांना मोठं यश आलं. पोलीस सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांपर्यंत जावून पोहोचले. सतीश वाघ हे खरंतर राजकारणात नाहीत. ते व्यवसाय करतात. त्यांचं कुणाशी वैरही नाही. तरीही त्यांचं अपहरण करुन हत्या कुणी केली असेल? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरलं होतं. अखेर सतीश वाघ यांच्या हत्येमागे नेमकं कोण होतं ते स्पष्ट झालं आहे.

सतीश वाघ यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती, अशी धक्कादायक माहिती आता पोलीस तपासातून उघड झाली आहे. शेजारी राहणाऱ्या इसमाने सतीश वाघ यांच्या हत्येसाठी 5 लाख रुपयांची सुपारी दिली होती. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या घटेनाबाबत मोठा खुलासा केला आहे.

पुणे पोलीस आयुक्तांनी नेमकी काय माहिती दिली?

या घटनेतील एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये गाडीत ज्या 4 आरोपींनी सतीश वाघ यांची निर्घृण हत्या केली त्यापैकी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर यातील 1 आरोपी फरार आहे. पुणे पोलिसांकडून त्या फरार आरोपीचा शोध सुरु आहे. पुणे पोलिसांकडून या हत्येचं गूढ उकलण्यात आलं आहे. सतीश वाघ यांच्या शेजारील व्यक्तीने वैयक्तिक वादातून त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर येत आहे. सतीश वाघ यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने 5 लाख रुपयांची सुपारी दिली होती, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सुपारी देणाऱ्या शेजाऱ्याला देखील अटक केली आहे. चारही आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “पुणे क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलिसांनी अतिशय युद्ध पातळीवर या गुन्ह्याचा तपास केला आहे. अजूनही तपास सुरु आहे. सुरुवातीला घटना घडल्यापासून वेगवेगळे पथक या प्रकरणात काम करत होते. पोलिसांनी तपासाच्या पहिल्याच दिवशी 450 ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. त्या आधारावर पोलिसांनी जलद गतीने तपास करत अपहरण करताना वापरलेली गाडी ताब्यात घेतली. त्यानंतर हळूहळू आरोपी पोलिसांच्या हाती लागले. पोलीस या प्रकरणी ठोस पुरावे गोळा करत आहेत. या प्रकरणात ज्या व्यक्तीने 5 लाखांची सुपारी दिली होती त्याची चौकशी सुरु आहे. आरोपीला कठोर शिक्षा होईल या दृष्टीने पोलीस अत्यंत मेहनतीने काम करत आहेत”, अशी प्रतिक्रिया पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.