Police Recruitment : पोलीस कर्मचारी भरती प्रक्रिया गैरव्यवहार, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सहा रॅकेट्सचा पर्दाफाश

नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या पिंपरी चिंचवड शहर पोलीस कर्मचाऱ्यांची 720 जागासाठी ही पोलीस भरती झाली होती. या भरती परीक्षेत झालेल्या परीक्षेत 31 जणांना पोलीस कर्मचारी म्हणून रुजू होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना जेरबंद केलंय.

Police Recruitment : पोलीस कर्मचारी भरती प्रक्रिया गैरव्यवहार, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सहा रॅकेट्सचा पर्दाफाश
पोलीस कर्मचारी भरती प्रक्रिया गैरव्यवहार प्रकरणी सहा रॅकेट्सचा पर्दाफाशImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 7:34 PM

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा 4 ने शहर पोलीस कर्मचारी भरती (Police Constable Recruitment) प्रक्रियेत गैरव्यवहार करणाऱ्या सहा टोळ्यांचा पर्दाफाश (Exposed) करत महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. या गैरव्यवहारात आतापर्यंत 56 आरोपींना पिंपरी चिंचवड पोलीस गुन्हे शाखेने अटक (Arrest) केली आहे. या गैरव्यवहारात एकूण 121 आरोपींचा सहभाग असल्याचे स्पष्ट झालंय. नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या पिंपरी चिंचवड शहर पोलीस कर्मचाऱ्यांची 720 जागासाठी ही पोलीस भरती झाली होती. या भरती परीक्षेत झालेल्या परीक्षेत 31 जणांना पोलीस कर्मचारी म्हणून रुजू होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना जेरबंद केलंय. याच परीक्षेदरम्यान मुन्नाभाई एमबीबीएस ह्या चित्रपटाप्रमाणे मास्कमध्ये मोबाईल ठेवून आलेल्या काही उमेदवार आढळून आले होते. त्यामुळे ही भरती प्रक्रिया राज्यभर गाजली होती. त्यातच औरंगाबादच्या राहुल गायकवाड पोलिस कॉन्टेबलचा त्यात समावेश असल्याने या परीक्षेची चांगलीच चर्चा झाली होती.

उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली असता गैरव्यवहार उघड

दरम्यान या भरती परीक्षा प्रक्रिया झाल्यानंतर उमेदवाराची कागदपत्रे पडताळणी वेळी हा गैरव्यवहार समोर आला. या परिक्षार्थी विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षा देऊन पास झालेल्या विद्यार्थीनी सामूहिक कॉपी करण्यात मदत केल्याचं समोर आलं आहे. पोलीस भरतीमध्ये बहुतांश उमेदवारानी स्पाय मोबाईल डिव्हाईस या एटीएम कार्डसारख्या दिसणाऱ्या आकाराचा मोबाईल आपल्या अंतर्वस्त्रामध्ये लपवून त्या स्पाय मोबाईल डिव्हाईसला अतिशय लहान अशा एअर बड्स ब्ल्यूटूथ आपल्या कानामध्ये लावून हे उमेदवार परीक्षा सोडवत होते.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी सहा रॅकेट्स उद्धवस्त केले

काही उमेदवारांनी आपल्या शर्टच्या आतमधून एक वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आलेल्या टी-शर्टमध्ये मोबाईल ठेवत त्यात एक विशिष्ट प्रकारचे अँप डाऊनलोड करून त्यामधून परीक्षेसाठी आलेल्या प्रश्न पत्रिकेचे स्नॅप शॉट निघत आणि ते स्नॅप शॉट हे आपोआप जी-मेलमध्ये सेव्ह होत. त्याच जी-मेलचा अक्सेस परीक्षा केंद्राच्या बाहेर बसलेल्या ह्या टोळीतील दुसऱ्या सदस्यांना मिळत होते. त्यानुसार टोळीतील सदस्य परीक्षा केंद्रात असलेल्या परिक्षार्थी उमेदवारांना प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी मदत करत होते. आता त्याच भरती प्रक्रियेत पिंपरी चिंचवड पोलिसांनी सहा रॅकेट उध्वस्त केलेत. विशेष म्हणजे या सहा रॅकेटमध्ये 4 टोळ्या औरंगाबादच्या तर एक जालना आणि एक बीडमध्ये आहे. (Six rackets busted by Pimpri Chinchwad police in case of malpractice in police recruitment process)

हे सुद्धा वाचा

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...