पुण्यात MPSC उत्तीर्ण तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ, सुप्रिया सुळे यांचं पुणे पोलिसांसाठी ट्विट

पुण्यात एका घटनेने खळबळ उडाली आहे. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तरुणीचा किल्ल्याच्या पायथ्याशी मृतदेह आढळला आहे.

पुण्यात MPSC उत्तीर्ण तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ, सुप्रिया सुळे यांचं पुणे पोलिसांसाठी ट्विट
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 10:58 PM

विनय जगताप, पुणे : MPSC परीक्षा पास झालेल्या तरुणीचा मृतदेह आढळल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरुणीचा मृतदेह आढळून आला.दर्शना दत्तू पवार असं मृत तरुणीचं नाव आहे. 8 दिवसांपासून दर्शना बेपत्ता होती. वन खात्याची आरएफओ ही परीक्षा पास झाली होती. 15 जूनला सिंहगड रोडच्या नऱ्हे पोलीस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती.8 दिवसानंतर तरुणीचा मृतदेह आढळल्यान खळबळ उडाली आहे. तरुणीचा खून झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या घटनेवर ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं की, ‘एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या दर्शना पवार या मुलीचा मृतदेह किल्ले राजगडाच्या पायथ्याला सापडला. हि घटना अतिशय दुर्दैवी आहे. प्रशासकीय सेवेत रुजू होण्यापुर्वी हि घटना घडली हे अतिशय खेदजनक आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलीसांनी योग्य दिशेने तपास करुन दर्शनाला न्याय द्यावा.’

फिर्यादी यांची मुलगी दर्शना ही सत्कार घेण्यासाठी ९ जून रोजी पुण्यातील स्पॉट लाईट अॅकॅडमी येथे आली होती. ११ जून सायंकाळी चार वाजेपर्यंत ती आमच्या संपर्कात होती . मात्र १२ रोजी दर्शना ला आम्ही दिवसभर फोन करत होतो. मात्र तिने फोन उचलले नाहीत म्हणून आम्ही स्पॉट लाईट अॅकॅडमी येथे येऊन आम्ही चौकशी साठी आलो तेव्हा आम्हाला समजले की, दर्शना ही त्याचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे सोबत सिंहगड आणि राजगड याठिकाणी फिरण्यासाठी गेली आहे. मात्र हे दोघेही संपर्कात नाहीत आणि माघारी देखील आलेले नाहीत. म्हणून त्यांनी सिंहगड रोड पोलिसात मिसिंगची तक्रार दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सतीचा माळ या परिसरात हा मृतदेह सापडला आहे. साधारण आठ दिवसांपूर्वी हा खून झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. सापडलेला मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून मृतदेहाच्या जवळ काही वस्तू सापडल्या असून त्यावरून तरुणीची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे.

संबधित तरुणी ही पुण्यात एमपीएससी करत होती. ती परीक्षा ती पासही झाली होती. मात्र आठ दिवसानंतर अचानक मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वेल्हे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या घटनेने नेमका खून कुठल्या कारणाने झाला याचा तपास करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.