TET Exam Scam : टीईटी परीक्षा गैरप्रकार तपासात पुणे पोलिसांचं अटकसत्र सुरुच, उत्तर प्रदेशातून आणखी एकाला अटक
पुणे सायबर पोलिसांकडून टीईटी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी उत्तर प्रदेशातील लखनऊ मधून एकाला अटक करण्यात आली आहे. सौरभ त्रिपाठी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
पुणे: टीईटी परीक्षेतील घोटाळ्याची (TET Exam Scam) व्याप्ती वाढत असल्याचं दिसून येत आहे. बंगळुरुमधून आश्विन कुमार (Ashwin Kumar) याला अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Cyber Police) मोर्चा उत्तरेकडे वळवला आहे. उत्तर प्रदेशातून पुणे पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. सौरभ त्रिपाठी ( Saurabh Tripathi) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
सौरभ त्रिपाठीला अटक
पुणे सायबर पोलिसांकडून टीईटी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी उत्तर प्रदेशातील लखनऊ मधून एकाला अटक करण्यात आली आहे. सौरभ त्रिपाठी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पुणे सायबर पोलीस सौरभ त्रिपाठीला पुण्यात आणणार आहेत. पुण्यात आणून पुणे पोलीस सौरभ त्रिपाठीची चौकशी करण्यात येणार आहे. सौरभ त्रिपाठी हा जीए टेक्नॉलॉजी कंपनीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. सौरभ त्रिपाठी हा विनर कंपनी चालवत असल्याची माहिती आहे.
बंगळुरुतून काल एकाला अटक
जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला बंगळूरमधून अटक करण्यात आलीय. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी थेट राज्याबाहेर कारवाई केलीय.या प्रकरणाचे धागेदोरे हे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसतंय. 2017 मध्ये आश्विन कुमार हा जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता. प्रीतिश देशमुखचा हा वरिष्ठ होता.
सुखदेव डेरेही अटकेत
सुखदेव डेरे हे औरंगाबाद विभागीय बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यांना अटक केलीय. यापूर्वी डेरेंना निलंबित करण्यात आली होती. या प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसत आहे.
2018 च्या परीक्षेतही घोटाळा
2018 मध्ये टीईटी परीक्षा झाली होती त्यामध्ये गैरप्रकार झाला होता, अशी माहिती पुणे पोलिसांनी मंगळवारी दिली होती. त्या परीक्षेतही आतासारखाच घोळ त्यावेळी झाला होता. 15 जुलै 2018 ला परीक्षा झाली तर निकाल 12 ऑक्टोबरला निकाल लागला होता. त्यावेळचे परीक्षा नियंत्रक होते डेरे त्यांना अटक केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार 500 लोकांच्या प्रमाणपत्रासंदर्भात माहिती मिळालीय. हा सर्व प्रकार 5 कोटी रुपयांपर्यंतचा असेल, असा अंदाज आहे.
इतर बातम्या:
प्रीतिश देशमुखच्या घरी पोलीस भरतीची हॉल तिकीट; आरोग्य, म्हाडा, टीईटीनंतर धक्कादायक गोष्टी समोर
TET exam Scam Pune Cyber Police arrested Saurabh Tripathi from UP Lucknow