Pune crime| चप्पल चोरीचा आळ सहन न झाल्याने 17 वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल

चोरीचा खोटा आळ आल्याने पायल नैराश्यात गेली. तिला चोरीचा खोटा आरोप सहन न झाल्याने , पायलने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. 

Pune crime| चप्पल चोरीचा आळ सहन न झाल्याने 17 वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 5:31 PM

पुणे- चप्पल चोरीचा आळ घेतल्याचे सहन न झाल्याने 17  वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोंढव्यातील मोहम्मदवाडी परिसरातील कृष्णांनाग्र येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी घर मालकिणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर झालं अस की …

पायल बाबू चव्हाण (वय 17) हे अल्पवयीन तरुणीचे नाव आहे.मृत पायल मागील काही महिन्यांपासून पल्लवी अग्रवाल यांच्या घरी घरकामगार काम करत होती. काही दिवसांपूर्वी पल्लवी अग्रवाल हिने पायलवर पर्स वचप्पल चोरीचा आळ घेतला. एवढ्यावरच न थांबता याबाबत तिला अत्यंतअपमानकारक वागणूक देत तिला त्रास दिला. चोरीचा खोटा आळ आल्याने पायल नैराश्यात गेली. तिला चोरीचा खोटा आरोप सहन न झाल्याने , पायलने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.  याबाबत पायलची आईने कोंढवा पोलीस स्थानकात घर मालकीण पल्लवी अग्रवाल हिच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी पल्लवी रितेश अग्रवाल (वय 40 या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अपहरण करत एकाचा खून

दुसरीकडं पूर्व वैमनस्यातून अपहरण करत एकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. बबन बाबासाहेब केंगार (वय 40  रा. मोशी) असे खून झालेल्याचे नाव आहे या प्रकरणी पत्नीने पोलिसात तक्रार दिली आहे. एमआय डीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत बबन यांचे काही दिवसांपूर्वी मयूर अनिल सरोदे, गौरव सरोदे, अनिल सरोदे यांच्या सोबत भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरत त्यांनी बबन यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करत त्यांचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह खडी मशीन येथे निर्जन ठिकाणी टाकून देण्यात आला.

Nanded murder : 31 डिसेंबरची पार्टी त्याच्यासाठी शेवटची ठरली, मित्रांनी गच्चीतून फेकलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा आणि टीकेला भाजपचं जोरदार प्रत्युत्तर, काय म्हणाले भाजप नेते?

Hair care : केसांच्या चांगल्या वाढीसाठी चिंतीत आहात, या टिप्स येतील तुमच्या उपयोगी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.