AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रांजणगाव MIDCमध्ये गुन्हेगारी वाढली; खंडणी वसूल करणाऱ्या कामगार नेत्याला अटक, गुन्हेगारांना रोखण्याचं पोलिसांपुढे आव्हान

मागच्या काही दिवसांमध्ये रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) भागात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. खंडणी, (Extortion) खून (Murder) आणि अपहरणासारख्या (Kidnapping)गंभीर गुन्ह्यांची संख्या एमआयडीसी परिसरात वाढली आहे. वाढलेली ही गुन्हेगारी रोखण्याचं आव्हान पोलिसांपुढे उभं ठाकलं आहे.

रांजणगाव MIDCमध्ये गुन्हेगारी वाढली; खंडणी वसूल करणाऱ्या कामगार नेत्याला अटक, गुन्हेगारांना रोखण्याचं पोलिसांपुढे आव्हान
Crime News
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 2:59 PM

रांजणगाव : मागच्या काही दिवसांमध्ये रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) भागात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. खंडणी, (Extortion) खून (Murder) आणि अपहरणासारख्या (Kidnapping)गंभीर गुन्ह्यांची संख्या एमआयडीसी परिसरात वाढली आहे. वाढलेली ही गुन्हेगारी रोखण्याचं आव्हान पोलिसांपुढे उभं ठाकलं आहे. या गुन्ह्यांमध्ये दबावामुळे तक्रार करणाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे पोलिसांनाही गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मर्यादा येत आहेत. तर गुंडांच्या दबावामुळे कंपन्या कशा चालवायच्या असा प्रश्न कंपनी मालक विचारू लागलेत. (The number of serious crimes like ransom, murder and kidnapping has increased in the Ranjangaon MIDC)

कंत्राटदारांकडून खंडणीची वसूली, माथाडी कामगार नेत्याला अटक

रांजणगाव एमआयडीसीमध्ये एका माथाडी कामगार नेत्याला खंडणी वसूल केल्याच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली आहे. एमआयडीसीमध्ये स्टीलचं उत्पादन करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीतल्या एका अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. काशिनाथ पाचंगे आणि वामन मुळे अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी शिरूर तालुक्यातल्या ढोक सांगवी इथले रहिवासी आहेत.

खंडणीची मागणी, जीवे मारण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी काशिनाथ पाचंगे याची एमआयडीसी परिसरात कामगार युनियन आहे. तो स्टील कंपनीच्या वाहतूकदार, कंत्राटदार आणि पुरवठादार यांच्याकडून खंडणी वसूल करत होता. कंपनीला कच्चा माल पुरवठा करायचा असेल तर आपल्याला खंडणी द्यावी लागेल, असं आरोपी पाचंगे याने कंपनीच्या पुरवठादार आणि वाहतुकदारांना सांगितलं होतं. त्याचा दबाव एवढा होता की, त्याला खंडणी दिल्याशिवाय तो कोणालाही कंपनीच्या आवारात येउ देत नव्हता. एवढंच नाही तर याचा जाब विचारला म्हणून कंपनीचे एचआर राहुल भागवत यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर भागवत यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आणि पोलिसांनी भादंवि 384, 385, 506, 34  या कलमांखाली गुन्हा दाखल करत आरोपी काशिनाथ पाचंगे याला अटक केली आहे. रांजणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार राऊत तपास करत आहेत.

दबावात काम करतात कर्मचारी आणि कामगार

रांजगणगाव आणि चाकण एमआयडीसीमध्ये खंडणी आणि धमकावण्याचे प्रकार सर्रासपणे घडत असल्याचं या परिसरात असलेल्या कंपनीचालकांचं म्हणणं आहे. कंपनीचं व्यवस्थापन आणि कामगारांना त्याचा रोज सामना करावा लागतो. यासंदर्भात मंत्री आणि पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्याचंही काही कंपनीचालकांनी सांगितलं. मात्र, त्याचा काही परिणाम झाला नसल्याचा आरोपही त्यांनी केला. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्यानं या भागात कर्मचारी आणि कामगारांना कायम दबावात काम करावं लागतं, असंही कंपनीचालकांनी सांगितलं.

कंपनी चालवण्याचं मालकांपुढे अव्हान

एमआयडीसी परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढण्याचं सर्वात मोठं कारण हे कंपन्यांची कंत्राटं असल्याचं एका कंपनी चालकानं सांगितलं. एमआयडीसीमध्ये भंगार, वाहतूक, कामगार, हाऊसकिपींग आणि कँटीनचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल होत असल्यानं स्थानिक पुढाऱ्यांपासून गुंडांपर्यंत अनेकजण यामध्ये सहभागी आहेत. अनेक कंपनी मालकांकडून प्रोटेक्शन मनी च्या नावाखाली खंडणीही वसूल केली जाते. खंडणी दिली नाही तर कंपनी चालवण्यात अडथळे निर्माण केले जातात. त्यामुळे अशा स्थितीला तोंड देत एमआयडीसीत कंपनी चालवणं मालकांसाठी एक अव्हान बनलं आहे.

संबंधित बातम्या :

सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद, नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाची कारवाई

2 तासाचा 2 लाख रुपये रेट, कोरोनाने शूटिंग बंद, मुंबईत सेक्स रॅकेटमध्ये सापडलेल्या अभिनेत्रीची कहाणी

मनमाडमध्ये दारु पिण्याच्या जागेवर बसण्यावरुन वाद; तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी.
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले...
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले....
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.