Pune Youth Drowned : मावळमधील कुंडमळा परिसरात तरुण वाहून गेला, नदीत मस्ती करणे जीवावर बेतले

वैभव देसाई हा तरुण पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी येथील रहिवासी असून गुरुवारी तो मित्रासोबत कुंडमळा येथे पिकनिकला आला होता. यावेळी नदीत उतरुन दोघे मित्र मस्ती करत होते.

Pune Youth Drowned : मावळमधील कुंडमळा परिसरात तरुण वाहून गेला, नदीत मस्ती करणे जीवावर बेतले
मावळमधील कुंडमळा परिसरात तरुण वाहून गेलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 6:49 PM

मावळ : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे वर्षा सहली (Picnic)चा आनंद घेण्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी येथून आलेला एक युवक (Youth) पाण्यात वाहून गेल्या (Swept Away)ची घटना आज उघडकीस आली आहे. वैभव देसाई असं या तरुणाचे नाव आहे. तो मित्रासोबत कुंडमळा परिसरात आला होता. दोन तीन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे नदीचा प्रवाह प्रभावित झालेला असताना देखील ते पाण्यात उतरले होते. यावेळी प्रवाहात वैभव वाहून गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस आणि मावळ वन्यजीव रक्षक टीमचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

नदीत मस्ती करताना पाय घसरला आणि प्रवाहासोबत वाहून गेला

राज्यात सध्या पावसाने धूमशान घातले आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरुन वाहत आहे. पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढला आहे. वैभव देसाई हा तरुण पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी येथील रहिवासी असून गुरुवारी तो मित्रासोबत कुंडमळा येथे पिकनिकला आला होता. यावेळी नदीत उतरुन दोघे मित्र मस्ती करत होते. यावेळी वैभवचा पाय घसरला आणि तो पाण्यात वाहून गेला. घटनेची माहिती समजल्यानंतर तळेगाव दाभाडे पोलीस आणि मावळ वन्यजीव रक्षक टीमचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. मात्र अंधार पडल्याने शोध कार्य थांबवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आले, मात्र अद्याप त्याचा शोध लागला नाही. (The youth was swept away in the Kundmala river of Maval)

हे सुद्धा वाचा

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.