Maval Crime: मावळमध्ये एक हजार रुपयांसाठी दुकानदारावर पिस्तुल रोखले, घटना सीसीटीव्हीत कैद
सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास आरोपी देवा जमादार दुकानात आला. त्याने दिनेश चौधरी यांच्याकडे 1 हजार रुपये मागितले. ते पैसे देण्यास चौधरी यांनी नकार दिला असता देवा याने स्वतः जवळ बेकायदेशीर असलेले पिस्तुल काढून ते लोड केले आणि फिर्यादीवर रोखले.
पुणे : दुकानात येऊन पिस्तुल लोड करीत एकाने दुकानदाराकडे पैशाची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील गहुंजे येथे ही थरारक घटना घडली आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात देवा जमादार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
एक हजार रुपये न दिल्याने पिस्तुल रोखले
दिनेश चौधरी यांचं मावळमधील गहुंजे याठिकाणी साई ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान आहे. सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास आरोपी देवा जमादार दुकानात आला. त्याने दिनेश चौधरी यांच्याकडे 1 हजार रुपये मागितले. ते पैसे देण्यास चौधरी यांनी नकार दिला असता देवा याने स्वतः जवळ बेकायदेशीर असलेले पिस्तुल काढून ते लोड केले आणि फिर्यादीवर रोखले. चौधरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच यावेळी चौधरी यांची आई मध्ये आली असता देवाने तिच्यावर देखील पिस्तुल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमरात कैद झाला आहे. हे पाहून ग्राहकांनी दुकानातून काढता पाय घेतला. अवघ्या एक हजार रुपयांसाठी त्याने हे कृत्य केलं. बिहार स्टाईल त्याने धाडस केल्याने सर्वांनाच धक्का बसला. यामुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागलेत.
हिंगोलीत बंदुकीचा धाक दाखवून बँक लुटली
दरम्यान हिंगोलीतही अशाच प्रकारची घटना आज उघडकीस आली आहे. बंदुकीचा धाक दाखवून बँक लुटल्याची धक्कादायक घटना आज हिंगोलीत घडली आहे. हिंगोलीतील वसमत तालु्क्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँक चोरांनी बंदुकीचा धाक दाखवत लुटली आहे. तसेच चोरट्यांनी हवेत गोळीबारही केला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली. शहरात सर्वत्र नाकाबंदी करीत 24 तासांच्या आत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. (Thieves demand money from shopkeepers in Maval Pune, Incident captured on CCTV)
इतर बातम्या
CCTV Video | दोघे आले, एकानं बंदूक ताणली, हवेत गोळीबार करत बँक लुटून पसार! कुठं घडला थरार?