जगावेगळी चोरी! तलावातून चोरले तब्बल 5 लाखांचे मासे, चौघांविरोधात तक्रार, पोलीसही चक्रावले

कोरोना काळात चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. काही ठिकाणी वाहन चोरीच्या घटना घडत आहेत.

जगावेगळी चोरी! तलावातून चोरले तब्बल 5 लाखांचे मासे, चौघांविरोधात तक्रार, पोलीसही चक्रावले
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 7:35 PM

इंदापूर (पुणे) : कोरोना काळात चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. काही ठिकाणी वाहन चोरीच्या घटना घडत आहेत. तर काही ठिकाणी चैन स्नॅचिंग आणि घरफोडी सारख्या गंभीर चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एक विचित्र चोरीची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी इंदापूरच्या शेतकऱ्याच्या शेततळ्यातून तब्बल पाच लाखांचे मासे चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे इंदापूरसह बारामती तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संबंधित प्रकार हा इंदापूर तालुक्यातील पोंधवडी गावात घडला आहे. पोंधवडीचे शेतकरी बापूराव पवार यांच्या शेततळ्यातून पाच लाखांचे मासे चोरीला गेले आहेत. याप्रकरणी पोंधवडी येथील चार जणांविरुद्ध इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापूराव पवार यांच्या तक्रारीनुसार चोरीला गेलेल्या माशांची किंमत 5 लाखांपेक्षा जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.

15 महिन्यांपूर्वी शेततळ्यात माशांचे बीज सोडले

शेतकरी बापूराव पवार यांनी त्यांच्या शेततळ्यात 15 महिन्यांपूर्वी सायफरनिस आणि चिलापी जातीच्या माशांचे बीज सोडले होते. दरम्यान 7 जुलैला शेततळ्यातील मासे चोरीला गेल्याचे पवार यांच्या निदर्शनात आले. हे मासे शेजारीच असलेल्या लोकांनी चोरल्याची फिर्याद पवार यांनी दिली आहे. यावरून भिगवण पोलिसांनी चार जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शेतकऱ्याची प्रतिक्रिया

“आम्ही परंपरागत शेती करतो. पण वातावरणाच्या अनिश्चिततेमुळे आमचं शेतात अनेकदा नुकसान होतं. त्यामुळेच आम्ही शेतात 200 बाय 100 आकाराचं तलाव बनवलं. त्याद्वारे आम्ही मासे पालनाचा कारभार सुरु केला”, असं बापूराव पवार यांनी सांगितलं.

“आम्ही 15 महिन्यांपूर्वी सायफरनिस प्रजातीचे 5 हजार आणि चिलापी प्रजातीचे 7 हजार बीज सोडले. माशांचं चांगलं संगोपन केल्यामुळे शेततळ्यातील मासे हे 300 ते 500 ग्रॅमचे झाले होते. शेततळ्यातील मासे विकण्यासाठी आम्ही व्यापाऱ्यांना भेटलो. आमचा व्यापाऱ्यांसोबत व्यवहारही केला. पण जेव्हा मासे पकडायला गेलो तर तलावातून मासेच गायब होते. शेततळ्यातील मासे चोरीला गेल्याचं माझ्या लक्षात आलं”, अशी प्रतिक्रिया शेतकरी बापूराव पवार यांनी दिली.

हेही वाचा :

आधी पतीने हॉटेलात विष पिऊन जीव दिला, दहाव्या दिवशी उच्चशिक्षित मायलेकीचीही आत्महत्या

पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी महिलेचा भयानक कट, आधी खून करणाऱ्यासोबत लग्न, मग पिस्तूल खरेदी, नंतर…..

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.