पुण्यात दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळीमध्ये राडा, भर चौकात दिवसाढवळ्या थेट एकमेकांवर गोळीबार

पुण्यात भर दिवसा दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यात दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळीमध्ये राडा, भर चौकात दिवसाढवळ्या थेट एकमेकांवर गोळीबार
घटनास्थळाचा फोटो
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 5:42 PM

पुणे : पुणे जिल्ह्यात काल (21 ऑक्टोबर) महाराष्ट्र बँकेवर दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली असताना आज आणखी एक भयानक गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. पुण्यात भर दिवसा दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात तीन जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. पण त्यांचा रुगणालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या घटनेने मुळशी पॅटर्न सारख्या चित्रपटाची पुन्हा एकदा आठवण करुन दिली आहे.

गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही

संबंधित घटना ही पुण्याच्या लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. ऊरळी कांचन येथील तळवेडे चौकात गोळीबाराचा हा भयानक थरार घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचे अजिबात भय नसल्याचं हे पुन्हा एकदा समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी भर चौकात गोळीबाराची घटना घडत नाही तोपर्यंत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभवला असं म्हणता येणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. पण आता पुण्यात थेट भर चौकात गोळीबाराच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे आतातरी पोलीस यंत्रणा जागी होईल, अशी आशा सर्वसामान्यांकडून बाळगली जात आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, उरळी कांचन येथे दोन गुन्हेगार टोळींकडून पूर्ववैमनस्यातून भरदिवसा गोळीबार करण्यात आलाय. या गोळीबारात एका टोळीतील संतोष जगताप आणि इतर तीन जण गंभीर जखमी आहेत. लोणीकाळभोर परिसरातील उरुळी कांचन येथील तळवेडे चौकात ही गोळीबाराची घटना आज दुपारी घडली. या गोळीबाराच्या घटनेमध्ये 3 जण अतिशय गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यामधील दोघांची प्रकृती अतिशय म्हणजे अत्यंत गंभीर होती. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

गोळीबारामागे नेमकं कारण काय?

अप्पा लोंढे गँग आणि त्याच्या विरुद्ध असलेल्या एका टोळीमध्ये ही फायरिंग झाल्याची माहिती समोर आली आहे. संतोष जगताप याच्यावर देखील फायरिंग झाली आहे. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नेमकं काय घडलं? याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे टोळीयुद्ध भडकल्याची चर्चा सध्या आहे. भरदिवसा पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. संतोष जगतापवर पूर्वीच्या वादातून हा गोळीबार झाला असल्याचे समजते.

पुण्यात महाराष्ट्र बँकेवर दरोडा

दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात काल दुपारी महाराष्ट्र बँकेत दरोडा पडल्याची घटना नुकतीच समोर आली होती. संबंधित घटना ही शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली होती. पिंपरखेड येथे भर दिवसा दुपारी दीड वाजेच्या सुमारास महाराष्ट्र बँकेत दरोडा पडला. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत बँकेतील 31 लाख रुपये रोकड तसेच 2 कोटी रुपयांचे सोने पळवून नेले होते. संबंधित प्रकार हा बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले जवळपास पाच आरोपी हे बँकेत शिरले. ते चारचाकी वाहनातून आले होते. त्यांनी तोंड बांधलं होतं. ते बँकेत शिरले तेव्हा त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत सर्व कॅश पिशवित भरुन द्यायला सांगितली. तसेच त्यांनी बँकेच्या लॉकरमधील सर्व सोनं पिशवीत भरुन चारचाकी गाडीतून पळवून नेलं.

हेही वाचा :

दारु पिण्यावरुन हॉटेल मालकाशी वाद, दुसऱ्या दिवशी येऊन हल्ला, कर्मचाऱ्याला दोघांनी खंजीर भोसकला

लॉकडाऊनमध्ये पैसे मिळेना, तो साडी नेसून थेट किन्नर बनला, संधी मिळताच महिलांचे दागिने पळवायचा, अखेर सोलापुरातून बेड्या

बायकोचा खून करुन विमानातून ढकललं, 1985 मधील हत्याकांडाची तीन दशकांनी कबुली

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.