अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नी आणि प्रियकराने काढला काटा, दोन महिन्यानंतर असा झाला खुनाचा उलगडा
26 जुनला खेड (Khed) तालुक्यातल्या वाळद गावाच्या पुलाजवळ पोलिसांना एक मृतदेह आढळून आला होता. आता या प्रकरणाचं गूढ शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून (Murder) केल्याचा प्रकार उघड झाला आहे. तब्बल दीड महिन्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांना (Pune Rural Police) या खुनाचा उलगडा करण्यात यश आलं आहे.
पुणे : 26 जुनला खेड (Khed) तालुक्यातल्या वाळद गावाच्या पुलाजवळ पोलिसांना एक मृतदेह आढळून आला होता. आता या प्रकरणाचं गूढ शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून (Murder) केल्याचा प्रकार उघड झाला आहे. तब्बल दोन महिन्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांना (Pune Rural Police) या खुनाचा उलगडा करण्यात यश आलं आहे. या प्रकरणी पत्नी, प्रियकर आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Two months after the murder police have arrested the deceased’s wife and her boyfriend in khed)
26 जूनला सापडला होता मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढे इथल्या सोमनाथ बबन सुतार या 34 वर्षीय तरूणाचा मृतदेह चाकसमान धरणाअंतर्गत असलेल्या वाळद गावाच्या पुलाजवळच्या पाण्यात आढळून आला होता. खेड पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर चौकशी सुरू केली.
गावात खून झाल्याच्या चर्चा
सोमनाथच्या पत्नीचे गावातल्याच एका दुकानदाराशी अनैतिक संबंध असल्याच्या चर्चा होत्या. त्यात सोमनाथचा मृतदेह सापडल्यानं याच प्रकरणातून त्याचा खून झाला असल्याच्या चर्चा गावात दबक्या आवाजात सुरू झाली होती. परंतु पोलिसांना यासंबंधी काही धागेदोरे सापडत नव्हते. अखेर जवळपास दोन महिन्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे आणि चौकशीत आरोपींना खूनाची कबुली दिली आहे.
असा केला घात
सोमनाथ हा स्वतःच्या वाहनातून प्रवासी ने-आण करण्याचं काम करत होता. सोमनाथची पत्नी सोनल आणि गावातला दुकानदार रामदास शिंदे यांचे तीन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. सोमनाथ हा सोनल आणि रामदासच्या नात्यात अडथळा ठरत होता. म्हणून दोघांनी सोमनाथचा काटा काढण्याचं ठरवलं. रामदासने 26 जूनला सोमनाथला दारू पिण्याच्या बहाण्याने बोलवलं आणि त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह चाकसमान धरणाच्या बॅकवॉटरमध्ये फेकून दिला. कुणाला संशय येऊ नये म्हणून सोनलने सोमनाथ बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दिली.
दोन महिन्यांनी खूनाचा उलगडा, आरोपी अटक
खेडपासून 22 किमी अंतरावर वाळद गावाच्या पुलाजवळ सोमनाथचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तो ससून रुग्णालयात पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला. त्यात सोमनाथचा खून झाल्याचं स्पष्ट झालं आणि पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी कॉल रेकॉर्ड्स काढल्यानंतर त्यात आरोपी सोनल आणि रामदास यांच्यात तासनतास बोलणं होत असल्याचं समोर आलं. कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी सोमनाथची पत्नी, तिचा प्रियकर आणि त्यांच्या 3 मित्रांना अटक केली आहे.
संबंधित बातम्या :