धक्कादायक, हॉटेलमधील अंडे चोरल्याचा संशयावरून महिलेला कपडे उतरवण्यास भाग पाडले
Pune Crime News | पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात महिला कर्मचाऱ्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्यास अंडे चोरल्याचा आरोपावरुन कपडे उतरवण्यास लावले आहे. या प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजित पोते, पुणे दि.18 डिसेंबर | पुणे शहरात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेवर अंडे चोरल्याचा आरोप झाला. त्या आरोपानंतर त्या महिलेला अंगावरील कपडे उतरवण्यास लावले. हा प्रकार पुणे शहरात हॉटेल पार्क ऑर्नेटच्या कुकने केले. मुकेश सिंह पुंडील असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शिक्षण आणि सांस्कृतिक शहर आहे. सांस्कृित राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात महिला कर्मचाऱ्यासोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर सर्वच हादरले आहे. त्या कर्मचाऱ्यावर हॉटेल प्रशासनाने काय कारवाई केली का? यासंदर्भातील माहिती मिळू शकली नाही.
आरोपीवर गुन्हा दाखल
पुणे येथील हॉटेल पार्क ऑर्नेटमध्ये आरोपी मुकेश सिंह पुंडील हा शेफ म्हणून काम करत आहे. पिडीत ५० वर्षीय महिला या हॉटेलमध्ये कामाला आहे. मुकेश सिंह याने त्या कामगार महिलेवर तू अंडे कुठे चोरले असल्याचा आरोप केला. हे अंडे तू लपवून ठेवले आहे. यामुळे तुझी अंग झडती घ्यावी लागेल, असे म्हटले. त्यानंतर त्याने त्या महिलेला कपडे उतरण्यास भाग पाडले. आरोपी मुकेश सिंह येथेच थांबला नाही तर त्याने त्या महिलेचा रस्ता अडवून तिच्यावर शेरेबाजी केली. महिलेचा विनयभंग केला. पुणे शहरातील हॉटेल पार्क ऑर्नेटच्या कुकने केलेल्या या प्रकारानंतर संताप व्यक्त होत आहे. पुण्यासारख्या सुस्कृंत शहरात झालेल्या या प्रकाराबद्दल चिड व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा पोलीस तपास करत आहे.