इन्स्टाग्रामवरची मैत्री पडली महागात, आधी महिलेने जबरदस्तीने ठेवले शारीरिक संबंध, नंतर….
इन्स्टाग्रामवर (Instagram) एका अनोळखी महिलेशी मैत्री पनवेलच्या एका तरूणाला चांगलीच महागात पडली आहे. जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून नंतर तरूणाला लुबाडलं गेल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.
पुणे : सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून जग जवळ आलं आहे. अनेकदा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात येतो. मैत्री होते, पण अशावेळी समोरच्या व्यक्तीची पार्श्वभूमी माहित करून घेणं आवश्यक असतं. अन्यथा आयुष्य बदलून जाऊ शकतं. असाच एक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) एका अनोळखी महिलेशी मैत्री पनवेलच्या एका तरूणाला चांगलीच महागात पडली आहे. जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून नंतर तरूणाला लुबाडलं गेल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. (Young man was robbed after having forced sex by Instagram friend in Pune)
काय आहे घटना?
न्यू पनवेल इथं राहणाऱ्या ३१ वर्षीय तरूणाची पुण्यातल्या एका महिलेसोबत इन्स्टाग्रावर ओळख झाली. त्यानंतर बोलणं वाढत गेलं आणि त्यांच्यात मैत्री झाली. या महिलेनं तरूणाला पुण्यात भेटायला बोलावलं. त्यानुसार हा तरूण ७ ऑगस्टला कोंढव्यातल्या येवलेवाडी इथं महिलेला भेटायला आला. यावेळी या महिलेनं तरूणाला जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
गुन्हा दाखल करण्याची धमकी, पैशांची मागणी
तरूण आपल्या कारने पनवेलकडे जात असताना त्याला रस्त्यात ३ जणांनी अडवलं, जबरदस्तीने कारमध्ये बसले आणि तरूणाला मारहाण केली. ”तू या महिलेवर बलात्कार केला आहे. आम्ही तुझ्याविरोधात पोलिसांत तक्रार देणार आहोत” असं म्हणत तरूणाला धमकावलं. पैसे दिले नाही तर महिलेसोबत लग्न करावं लागेल, असं कागदावर लिहून घेतलं. त्यावर तरूणाचा सही आणि अंगठा घेतला. तरूणाकडे आरोपींनी ५ लाख रुपये देण्याची मागणी केली. पैसै दिले नाही तर पोलिसांत तुझ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. घाबरलेल्या तरूणाने आरोपींना त्याच्याजवळ असलेले रोख ५० हजार रुपये दिले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर एटीएम कार्डमधून जबरदस्तीने ३० हजार रुपये काढून घेतले.
घाबरलेल्या तरूणाची पोलिसांत फिर्याद
या घटनेनं घाबरलेला तरूण कसाबसा आपल्या घरी पोहोचला. पण त्यानंतरही त्याला आरोपींकडून सातत्यानं पैशांसाठी मागणी होऊ लागली. धमक्या दिल्या जाऊ लागल्या. त्यामुळे अखेर तरूणाने कोंढवा पोलीस ठाणे गाठत आपबिती सांगितली आणि फिर्याद दिली. तरुणाने फिर्याद दिल्यानंतर कोंढवा पोलिसांनी प्रगती इन्स्टाग्राम आयडी असणाऱ्या महिलेसह तिच्या ३ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित बातम्या :