पुणे शहरात काय आहे सुरु? आता दगडाने ठेचून केली हत्या

वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे पोलीस गुन्हेगारी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. परंतु पुणे शहरातील गुन्हे कमी होत नाही. आता दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे शहरात काय आहे सुरु? आता दगडाने ठेचून केली हत्या
पालघरमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्याने जीवन संपवलेImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 11:06 AM

पुणे : कोयता गँगची (koyata gang) पुणे शहरात वाढलेल्या दहशतीमुळे पुणे पोलीस (Pune Police)आक्रमक झाले आहेत. कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी धडका सुरु केला आहे. कोम्बिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करुन पोलीस जबर कारवाई करत आहे.  वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे पोलीस गुन्हेगारी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. परंतु पुणे शहरातील गुन्हे कमी होत नाही. आता दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणेमधील पिंपरी चिंचवड परिसरात हा प्रकर घडला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील महाळुंगे येथे हा खून झाला आहे. आरोपीला म्हाळुंगे पोलिसांनी सापळा रचून अवघ्या चार तासात जेरबंद केलं आहे.

पुणेमधील पिंपरी चिंचवड परिसरात हा प्रकर घडला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील महाळुंगे येथे हा खून झाला आहे. आरोपीला म्हाळुंगे पोलिसांनी सापळा रचून अवघ्या चार तासात जेरबंद केलं आहे. दीपक काशिनाथ राठोड (वय ३५) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून विठ्ठल मंगेश चव्हाण (वय २२) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल मंगेश चव्हाण (वय २२) आणि दीपक राठोड एकाच रूमवर राहत होते. दोघांनी दारू पिऊन चायनीजच्या ठेल्यावर जाऊन एकत्र जेवण केले. जेवणादरम्यान त्या दोघांमध्ये  किरकोळ कारणावरून वाद झाला. वादामुळे दारुच्या नशेत संतापलेल्या विठ्ठल चव्हाण याची दीपक राठोड सोबत झटापट झाली. विठ्ठलने रस्त्यावर पडलेला दगड दीपकच्या डोक्यात घातला. या घटनेत दीपकचा जागीच मृत्यू झाला. हत्या करुन विठ्ठल घटनास्थळावरून पसार झाला.

चार तासांत जेरबंद

स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी सापळा लावला आणि चार तासांत त्याला पकडले. पोलीस दिसताच विठ्ठल चव्हाण पळून जाण्याच्या तयारीत होता. परंतु पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.