जगावेगळी चोरी… चोरांनी थेट ईव्हीएम मशीनच पळवली, कशासाठी?; कारण काय?

पुण्यात चोरांचा एक अजब कारनामा उघडकीस आला आहे. चोरट्यांनी चक्क EVM मशीनवरच डल्ला मारत ते चोरलं. पुणे जिल्ह्यातील सासवड मधील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जगावेगळी चोरी... चोरांनी थेट ईव्हीएम मशीनच पळवली, कशासाठी?; कारण काय?
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 9:46 PM

दिपक कापरे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 6 फेब्रुवारी 2024 : पुणे तिथे काय उणे.. पुण्यात काहीही घडू शकतं अशा अर्थाची ही म्हण ! पण आजच्या काळात हीच म्हण खरी होताना दिसली आहे. कारण पुण्यात चोरांचा एक अजब कारनामा उघडकीस आला आहे. चोरट्यांनी चक्क EVM मशीनवरच डल्ला मारत ते चोरलं. पुणे जिल्ह्यातील सासवड मधील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चक्क तहसीलदार कार्यालयातून हे EVM मशीन पळवण्यात आले . याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपासासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.

नक्की काय घडलं ?

पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनची चोरी झालीय. सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. याबाबत सूत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवारी अशी दोन दिवस तहसील कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडण्यात आलेल आढळून आले. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधून एक ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याचं समजताच एकच खळबळ माजली. सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे, ही चोरी करताना ते चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैदही झाले.

ईव्हीएम चोरीला गेल्याचे समजताच, सासवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी ,फिंगरप्रिंट एक्सपर्ट ची टीम, एलसीबीची टीम असे पोलीसांचे पथक या ठिकाणी दाखल झाले व तपास सुरू केला. मात्र यासंदर्भात कोणतीही माहिती देणयास नकार देत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले. याबाबतीत कोणीही काहीही बोलण्यास तयार नाही.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....