बाजारातून परतलेल्या आईसमोर भयावह दृश्यं, तीन लेकरं पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत

राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील बदनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एकाच कुटुंबातील तीन मुलांचा घराबाहेर बांधलेल्या पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये दोन भाऊ आणि एका बहिणीचा समावेश आहे.

बाजारातून परतलेल्या आईसमोर भयावह दृश्यं, तीन लेकरं पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 3:48 PM

जयपूर : घराबाहेरील पाण्याच्या टाकीत एकाच घरातील तीन निष्पाप बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची करुणाजनक बातमी राजस्थानमधून समोर आली आहे. कामानिमित्त बाहेर गेलेली मुलांची आई घरी आली, तेव्हा समोर दिसणारं दृश्यं पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. या दुर्दैवी अपघातामुळे दिवाळीपूर्वीच कुटुंबात दुःखाचं वातावरण पसरलं आहे.

दोन भाऊ, एका बहिणीचा मृत्यू

राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील बदनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एकाच कुटुंबातील तीन मुलांचा घराबाहेर बांधलेल्या पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये दोन भाऊ आणि एका बहिणीचा समावेश आहे. लक्ष्मीपुरा कोटडा गावात झालेल्या या वेदनादायक अपघातामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

वडील मजुरीला, आई बाजारात

बदनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी विनोद कुमार मीना यांनी सांगितले की, लक्ष्मीपुरा कोटरा गावातील महेंद्र सिंह रावत यांच्या घराबाहेर पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. महेंद्रसिंग हे मजुरीनिमित्त गुजरातला गेले होते, तर हा अपघात झाला तेव्हा त्यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती.

सहा वर्षांखालील तीन बालकांचा मृत्यू

या दुर्घटनेत महेंद्र सिंह रावत यांची 6 वर्षांची मुलगी सीमा, 4 वर्षांचा मुलगा नरेंद्र आणि 2 वर्षांचा मुलगा पंकज यांचा मृत्यू झाला. खेळता-खेळता ही तिघं भावंडं घराबाहेर बांधलेल्या 10 फूट खोल पाण्याच्या टाकीत बुडाले.

तिन्ही मुलांचे मृतदेह पाण्याच्या टाकीतून बाहेर पडून आसिंद शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवल्याचे स्टेशन प्रभारी यांनी सांगितले. या मुलांची आई अपघाताच्या दोन तास अगोदर कामानिमित्त बाहेर गेली होती आणि घरी परतल्यावर तिने ही भयावह दृश्यं पाहिली.

संबंधित बातम्या :

नदीपात्रात गेला, सेल्फी काढायला लागला, पण पाय घसरला, बुलडाण्यात तरुणाचा दुर्दैवी अंत

नदीत पोहण्याचा मोह जीवावर, यवतमाळचे पाच जण नागपुरात बुडाले

बैल धुण्यासाठी मित्रांसोबत गेला, घरी परतलाच नाही, बुलडाण्यात तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.