Crime : एक बातमी, जी देताना आमचं काळीज जड झालंय, फोटो पहा म्हणण्याची आमची हिंमत नाही, तुम्ही सावध असा !

समाजात अशा प्रकारच्या विकृतींवर आळा बसलाच पाहिजे ही आमचीही भूमिका आहे. पण वैयक्तिक पातळीवर आधी आपण आपल्या बालबच्च्यांची अधिक काळजी घेऊ शकतो, मुले थोडी मोठी झाल्यावर समाजात वावरणाऱ्या विकृतींपासून त्यांना सतर्क करू शकतो. हेही नसे थोडके.

Crime : एक बातमी, जी देताना आमचं काळीज जड झालंय, फोटो पहा म्हणण्याची आमची हिंमत नाही, तुम्ही सावध असा !
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 4:44 PM

बस्सी (चितौडगढ) : अति रक्तरंजित, विकृत बातम्यांचं प्रदर्शन करणं तसं तर माध्यमांना नको असतं. पण नियमात बसवत समाजाला आरसा दर्शवण्याचं काम माध्यम आम्ही करतच असतो. यावरून अनेकदा टीकाही होते. समाजाची दुषणं अंगावर झेलत माणूसरुपी चेहऱ्यामागे दडलेली हैवानं आम्हाला उघडी पाडावीच लागतात. राजस्थानमधील (Rajasthan) अशाच एका नराधमाची ही बातमी. लैंगिक भूकेने हापापलेला हा चार चौघांमधलाच माणूस. लग्न समारंभात उत्साहात सहभागी झाला. पण लग्नमंडपात दुडूदुडू धावणारी, उड्या मारणारी, चार चौघांच्या कौतुकाचा विषय ठरणारी लहानगी बालकं याच्या वासनांधतेला बळी (Sexually Abusing) पडतील, याची साधी कल्पनाही कुणाच्या मनाला शिवली नाही. नातेवाईक मंडळी लग्नाच्या समारंभात मश्गूल असतानाच एका चार वर्षाच्या बालकाला (4 Year old boy) पळवून नेत या विकृताने त्याला वासनांधतेचा शिकार बनवलं. त्यानंतर त्याला लग्नमंडपात आणून सोडलं आणि पुन्हा एकदा तीन वर्षाच्या मुलीला उचलून नेलं. या बालिकेसोबतही इतकी घाणेरडी कृत्य केली की ती इथे लिहायलाही आम्हाला लाजिरवाणं वाटतंय. पण आपल्याच समाजातील ही घटना एका वृत्तातून समोर आलीय. दैनिक भास्करमध्ये प्रकाशित झालेल्या या वृत्तानं अवघा राजस्थान हादरून गेलाय. लग्न समारंभ आपल्याकडेही असतात, माणसाच्या रुपात दडलेली हैवानं इथेही असू शकतात, ही वास्तविकता नाकारता येत नाही. आपण सजग रहायला हवं, म्हणून हे वृत्त अधिक सविस्तर देत आहोत.

काय घडला नेमका प्रकार?

चित्तौरगड जिल्ह्यातील बस्सी भागातील एका गावातील हा प्रकार. गुरुवारी एका कुटुंबात दोन विवाहसोहळे आयोजित कऱण्यात आले होते. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. घोड्यावर बसून गावात दोन नवरदेव आले होते. पण या सगळ्या उत्साही मंडपात एक लिंगपिशाच्च होता. रामेश्वर धाकज (30). या हैवानानं आधी चार वर्षाच्या मुलाला उचलून दूर विहिरीवर नेलं. त्याच्याशी गैरवर्तन केलं. शरीरावर जागोजागी चावा घेतला. इवलासा जीव वेदनेनं विव्हळत होता. पण याचे अत्याचार संपतच नव्हते. अखेर लोकांच्या भीतीनं त्यानं त्या मुलाला पुन्हा मंडपात आणून ठेवलं.

3 वर्षाच्या मुलीला तर…

चार वर्षाच्या मुलावर अत्याचार केल्यानंतर पुन्हा एकदा या हैवानाची भूक चाळवली. मंडपातून त्यानं तीन वर्षाच्या मुलीला उचललं. तिच्याही शरीरावर सात ते आठ ठिकाणी चावा घेतला. गळा दाबून मारलं. तिचा आवाज कायमसाठीच बंद केला. त्यानंतर तिला विहिरीत टाकून दिलं. एवढी घाणेरडी कृत्य करून पुन्हा एकदा हा मंडपात आला. लग्नसमारंभात सहभागी झाला आणि घरी परतला.

नराधमाचं कृत्य अखेर उघडं पडलं…

लग्न समारंभ उरकल्यावर इकडे नातेवाईक घरी गेले. पण तीन वर्षीय मुलगी बेपत्ता होती. संध्याकाळी पोलिस तपास सुरु झाला. आजूबाजूच्या गावकऱ्यांची चौकशी केली असता, ही मुलगी भिलवाडातील बीगोद परिसरातील किशनपुरा येथील रहिवासी रामेश्वरसोबत विहिरीवर दिसली होती. पोलिसांसहित गावकरी रामेश्वरच्या घरी पोहोचले. आपण केलेल्या कृत्याची कबूली द्यायला आधी या नराधमानं खूप टाळाटाळ केली. अखेर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर हे घृणास्पद कृत्य कबूल केलं. पोलिसांनी या आरोपीवर पॉक्सो कायद्याअतंर्गत 376, 302 व एससीएसटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

हैवानाला फाशी देण्याची मागणी

दरम्यान, लहान बालकांसोबत एवढा घृणास्पद प्रकार करणारा विकृत हा समाजासाठी कलंक असल्याची संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहे. या माणसाला लवकरात लवकर फाशी दिली जावी, या मागणीसाठी बस्सी गावकऱ्यांनी आंदोलनही केलंय. समाजात अशा प्रकारच्या विकृतींवर आळा बसलाच पाहिजे ही आमचीही भूमिका आहे. पण वैयक्तिक पातळीवर आधी आपण आपल्या बालबच्च्यांची अधिक काळजी घेऊ शकतो, मुले थोडी मोठी झाल्यावर समाजात वावरणाऱ्या विकृतींपासून त्यांना सतर्क करू शकतो. हेही नसे थोडके.

इतर बातम्या-

‘या’ लिंकवर क्लिक करणे पडेल महागात, इंडिया पोस्टने दिला इशारा, अन्यथा बॅंक खाते होईल रिकामे

Banana : यंदा केळीचा ‘गोडवा’च गायब, अस्मानी संकटानंतर आता महावितरणचा ‘शॉक’

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.