शेतात जाणाऱ्या महिलेची दोन्ही पाय कापून हत्या, जोडव्यांच्या चोरीसाठी सशस्त्र हल्ला

45 वर्षीय कंकुबेई यांचा मृतदेह शेतामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. धारदार शस्त्राने वार करुन त्यांच्या दोन्ही पायातील चांदीच्या जोडव्या काढण्यात आल्या होत्या. त्यांच्या शरीरभर जखम झाल्याच्या खुणा होत्या.

शेतात जाणाऱ्या महिलेची दोन्ही पाय कापून हत्या, जोडव्यांच्या चोरीसाठी सशस्त्र हल्ला
कूचबिहारमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा रहस्यमयरित्या मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 9:04 AM

जयपूर : राजधानी जयपूरनंतर आता राजस्थानमधीलच राजसमंद गावामध्ये शेतात जाणाऱ्या महिलेचे दोन्ही पाय कापून चांदीच्या जोडव्या चोरुन नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विरोध केल्याने महिलेच्या मानेवरही वार करण्यात आले, त्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

राजस्थानमधील राजसमंद येथील चारभुजा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अमरतिया गावात सोमवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 45 वर्षीय कंकुबेई यांचा मृतदेह शेतामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. धारदार शस्त्राने वार करुन त्यांच्या दोन्ही पायातील चांदीच्या जोडव्या काढण्यात आल्या होत्या. त्यांच्या शरीरभर जखम झाल्याच्या खुणा होत्या. त्यावरुन महिलेने मृत्यूपूर्वी दरोडेखोरांना जोरदार प्रतिकार केल्याचं दिसत होतं.

सकाळीच महिला शेतावर निघालेली

नवऱ्याला जेवण देण्यासाठी कंकूबाई भल्या सकाळीच शेतात निघाल्या होत्या, मात्र पत्नी शेतात न पोहोचल्याने नवरा उपाशीपोटी घरी आला, तेव्हा आई सकाळीच जेवण घेऊन शेताकडे निघाल्याचे मुलांनी सांगितले.

शोध न लागल्याने कुटुंबीयांची पोलिसात धाव

अखेर चिंताग्रस्त कुटुंबीय कंकूबाई यांच्या शोधासाठी घराबाहेर पडले, मात्र रात्री उशिरापर्यंत कुठलीही माहिती त्यांना मिळाली नव्हती. त्यानंतर चारभुजा पोलिस ठाण्यात कंकूबाई बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. त्यावेळी, सकाळी शेतात एका झाडाखाली महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खून आणि दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी एक संशयित दिसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

जोडव्या चोरीसाठी पाय कापल्याची दुसरी घटना

राजसमंदचे एसपी शिवलाल म्हणाले की, पोलिसांनी नाथद्वारा आणि अरमतिया चारभुजा येथील हत्या प्रकरणातील संशयितांना ताब्यात घेतले आहे, लवकरच त्यांना अटक केली जाईल. काही दिवसांपूर्वी जयपूरमध्येही अशाच प्रकारे शेतात गुरे चरत असलेल्या महिलेचे पाय कापून चांदीच्या जोडव्या काढण्यात आल्या होत्या. राजस्थानच्या ग्रामीण भागात महिला हात आणि पायात चांदीचे अलंकार घालतात. दरोडेखोरांची त्यावर नजर पडल्याचं दिसत आहे. राज्यात एकामागून एक घडलेल्या या प्रकारच्या दोन घटनांमुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे.

संबंधित बातम्या :

मशिनमध्ये स्कार्फ अडकला, पुण्यात 21 वर्षीय नवविवाहितेचा मृत्यू

ठाण्यात उच्चभ्रू वस्तीत राहायची, पण निघाली चोर, महागडा लॅपटॉप चोरताना महिलेचं फुटलं बिंग

कौटुंबिक वादामुळे पारा चढला, शेवटी डॉक्टरने भावावरच केला गोळीबार, गुन्हा दाखल, अहमदनगर हादरलं !

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.