ताईच्या बाळंतपणासाठी गेलेल्या 21 वर्षीय बहिणीवर बलात्कार, भावजींवर गुन्हा

पीडितेच्या मोठ्या बहिणीची नुकतीच डिलीव्हरी झाली होती. बाळंतपणामुळे घरातील कामं करण्यासाठी आणि मदतीसाठी तिने धाकट्या बहिणीला आपल्या घरी राहायला बोलावले होते, यावेळी मेव्हण्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे

ताईच्या बाळंतपणासाठी गेलेल्या 21 वर्षीय बहिणीवर बलात्कार, भावजींवर गुन्हा
फोटो : प्रतिकात्मक
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 8:55 AM

जयपूर : बहिणीच्या बाळंतपणासाठी तिच्या घरी गेलेल्या 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये उघडकीस आली आहे. पीडित मेव्हणीच्या तक्रारीनंतर भावजींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चहामध्ये गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केल्यानंतर भावजींनी आपल्यावर अत्याचार केला, असा आरोप पीडितेने केला आहे. (Rajasthan Sister in law allegedly Raped by Sister’s Husband came for baby’s delivery)

बाळंतपणानंतर मदतीसाठी बोलावलं

राजस्थानमधील भरतपूरमध्ये ही घटना घडली. पीडितेच्या मोठ्या बहिणीची नुकतीच डिलीव्हरी झाली होती. बाळंतपणामुळे घरातील कामं करण्यासाठी आणि मदतीसाठी तिने धाकट्या बहिणीला आपल्या घरी राहायला बोलावले. मात्र तिच्या मेव्हण्याची वाईट नजर तिच्यावर पडली. चहातून गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करुन भावजींनी आपला बलात्कार केला, अस आरोपी तिने केला आहे.

भावजींकडून बलात्कार, बहिणीचीही साथ

शुद्धीवर आल्यानंतर तिने घडलेला प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. धक्कादायक म्हणजे ताईनेही भावजींची साथ दिल्याचं पीडितेचं म्हणणं आहे. त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

उत्तर प्रदेशात नवविवाहितेवर गँगरेप

दुसरीकडे, लग्नानंतर दोनच दिवसात नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच उत्तर प्रदेशात उघडकीस आली होती. पीडितेच्या आरोपानुसार सासरी सहा ते सात जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. बलात्काऱ्यांमध्ये तिचा पती आणि दोघा मोठ्या दीरांचा समावेश होता. गँगरेप करायला तिच्या दोन नणंदा आणि जावाही प्रोत्साहन देत होत्या. सासरच्या मंडळींचं मन न भरल्यामुळे त्यांनी तिच्या गुप्तांगात काठी घालून गरम चटकेही दिले, असा आरोप आहे.

मध्य प्रदेशात विवाहितेवर बलात्कार

दरम्यान, मध्य प्रदेशात विवाहितेवर घरात घुसून बलात्कार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. धक्कादायक म्हणजे घटना घडली, त्यावेळी महिला पती आणि मुलांसोबत घरात झोपली होती. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आरोपी घरात शिरला, आणि महिला त्याला पती समजल्यामुळे भलताच प्रकार घडला. महिलेला आपली चूक समजताच तिने आरडाओरड केली, त्यावेळी आरोपी पसार झाला.

संबंधित बातम्या :

बांद्रा बँडस्टँडला 20 वर्षीय तरुणीवर गँगरेप, बॉयफ्रेण्डसह तिघा जणांना अटक

लग्नानंतर दोनच दिवसात नवविवाहितेवर गँगरेप, पतीसह दोन दीरांकडून अत्याचार

(Rajasthan Sister in law allegedly Raped by Sister’s Husband came for baby’s delivery)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.