नवऱ्याला सरप्राईज गिफ्ट देण्याची तयारी, बायकोलाच बसला शॉक, फसवणुकीमुळे आनंदावर विरजण

प्रियांकाने 17 डिसेंबर 2021 रोजी पती अभिषेकला त्याच्या वाढदिवशी आश्चर्यचकित करण्यासाठी फॅमिली फ्रेण्डची मदत घेतली. अभिषेकला मला एक फ्लॅट भेट द्यायचा आहे, असं तिने नितीन सिंग सिसोदियाला सांगितलं होतं. यावर नितीनने तिची ओळख मनसुख सोनी नावाच्या व्यक्तीशी करुन दिली.

नवऱ्याला सरप्राईज गिफ्ट देण्याची तयारी, बायकोलाच बसला शॉक, फसवणुकीमुळे आनंदावर विरजण
तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 9:01 AM

जयपूर : नवऱ्याला वाढदिवसानिमित्त सरप्राईज गिफ्ट देण्याची तयारी करणाऱ्या बायकोला मोठा धक्का बसला. महिलेने पतीला बर्थडेची भेट म्हणून फ्लॅट बुक (Flat Booking) करण्याचा निर्णय घेतला. मात्र तिची फसवणूक (Cheating) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थानमधील जोधपूर शहरात ही घटना उघडकीस आली आहे. महिलेची लाखो रुपयांना फसवणूक झाल्याचा आरोप केला जात आहे. बायको खरं तर नवऱ्याला वाढदिवशी सरप्राईज देणार होती, मात्र फसवणूक झाल्याने दोघांच्या आनंदावर विरजण पडलं. नको त्या पद्धतीने सरप्राईजचा भांडाफोड झाल्याने दाम्पत्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. आता पती-पत्नी दोघांनी मिळून पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण?

अभिषेक जैन आणि प्रियंका जैन यांनी नितीन सिंग सिसोदिया आणि मनसुख सोनी यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी दिनेश लखावत यांनी दिली. तक्रारीनुसार, प्रियांकाने 17 डिसेंबर 2021 रोजी पती अभिषेकला त्याच्या वाढदिवशी आश्चर्यचकित करण्यासाठी फॅमिली फ्रेण्डची मदत घेतली. अभिषेकला मला एक फ्लॅट भेट द्यायचा आहे, असं तिने नितीन सिंग सिसोदियाला सांगितलं होतं. यावर नितीनने तिची ओळख मनसुख सोनी नावाच्या व्यक्तीशी करुन दिली.

9 लाख रुपये देऊन करार

नितीन सिंग सिसोदिया याने प्रियंकाला सांगितले की, मनसुख सोनीला काही पैशांची गरज आहे, जर तू फ्लॅट विकत घेतलास, तर तुला फायदाच होईल. त्यावर, पती अभिषेकला न सांगता, 5 डिसेंबर 2019 रोजी प्रियांकाने वकील अनिल शर्मा यांच्यासमोर नितीन आणि मनसुखला 9 लाख रुपये देऊन करार केला. त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये नितीन सिंगने प्रियंकाला सांगितलं की इमारतीचं काम वेगाने सुरु आहे. लवकरच त्यांना फ्लॅटचे पझेशन मिळेल, तोपर्यंत तुम्ही 20 हजार रुपये मासिक हप्ता भरत राहा. जेणेकरून अंतिम पेमेंटच्या वेळी तुम्हाला नंतर कोणतीही अडचण येणार नाही.

फ्लॅटवर बँकेकडून आधीच कर्ज

ऑगस्ट 2021 पर्यंत प्रियंकाने नितीन सिंगला दरमहा 20 हजार रुपये दिले. मात्र त्यानंतर कागदपत्रे मागितल्यावर त्यांनी टाळाटाळ सुरू केली. इतकंच नाही, तर मुलाला पळवून नेण्याची धमकीही देऊ लागले. यानंतर प्रियांकाने हा संपूर्ण प्रकार पती अभिषेकला सांगितला. त्यामुळे त्यांनी नितीन सिंग सिसोदिया आणि मनसुख सोनी या दोघांकडेही कागदपत्रे मागितली, मात्र त्यांनी ती दिली नाहीत. नितीन सिंग हा विद्युत विभागात सरकारी कर्मचारी आहे. या फ्लॅटची माहिती गोळा केली असता, या फ्लॅटवर मनसुख सोनीने ऑगस्ट 2020 मध्ये बँकेकडून कर्जही घेतले असल्याचे आढळून आले.

यानंतर नितीनने महिलेची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. फ्लॅटचे बुकिंग प्रियंकाच्या नावावर झाले नव्हते, आता या प्रकरणी प्रियांकाने सरदारपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, पोलिस तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी सलीम गाझीचा मृत्यू, साखळी स्फोटात सलीम गाझीची काय भूमिका?

Solapur Accident | काम आटोपून घरी निघाले होते, पण वाटेतच काळानं गाठलं, तिघांचा दुर्दैवी अंत

कल्याणमध्ये वीज बिल कमी करण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणारा भामटा गजाआड

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.