AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संत बाळूमामांचा अवतार असल्याचं भासवणाऱ्या तथाकथित महाराज मनोहर मामा भोसले विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

संत बाळूमामांचा अवतार असल्याचं भासवणाऱ्या तथाकथित महाराज मनोहरमामा भोसले विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

संत बाळूमामांचा अवतार असल्याचं भासवणाऱ्या तथाकथित महाराज मनोहर मामा भोसले विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 8:28 PM
Share

पंढरपूर (सोलापूर) : संत बाळूमामांचा अवतार असल्याचं भासवणाऱ्या तथाकथित महाराज मनोहर मामा भोसले विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी याप्रकरणी कलम 376 2 n,‌ 376 d, 354 385 आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला. मनोहर मामाच्या अटकेसाठी करमाळा पोलिसांचे स्वतंत्र पथक रवाना झाले आहे.

मनोहर मामा विरोधात बारामती पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल

विशेष म्हणजे मनोहर मामा यांच्या विरोधात नुकतंच बारामती पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संत बाळूमांमाचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्यासह त्यांच्या दोन अन्य साथीदारांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा देत आरोपींनी लोकांची फसवणूक केली.

याप्रकरणी तिघांवर फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ-अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे यांचाही गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

कर्करोग बरा असे सांगून फिर्यादीकडून अडीच लाख उकळले

शशिकांत सुभाष खरात (रा. साठेनगर, कसबा, बारामती) या 23 वर्षीय तरुणाने याबाबत फिर्याद दिली आहे. 20 ऑगस्ट 2018 ते 31 ऑगस्ट 2021 या दरम्यान हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडिलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडिलांच्या व फिर्यादीच्या जिविताची भिती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेत फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान मनोहर भोसले विरोधात आलेल्या तक्रारींची गंभीर दखल पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी घेतली आहे. फसवणूक प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अटक करण्याची तजबीज सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मनोहर मामांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल

बारामती तालुक्यातील महेश आटोळे यांनी मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले यांनी अंधश्रद्धेतून फसवणूक झाल्याची तक्रार 31 ऑगस्ट 2021 रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, माझ्याकडून त्यांनी जवळपास 40 लाख रुपयाचा रो हाऊस घेतला होता. मात्र माझी कुठलीच कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे मी दिलेला रो हाऊस मनोहर मामा यांना परत मागितला. मात्र रो हाऊस मी तुला देणार नाही, कारण तुझ्या तंत्रविद्या करण्यात माझे लाखो रुपये खर्च झाले आहेत. तू मला ते पैसे परत कर त्यावेळेसच मी रो हाऊस परत करेन, असं मनोहर मामा यांनी सांगितले. यामुळे आटोळे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

हेही वाचा :

मनोहरमामा उर्फ मनोहर भोसलेसह तिघांवर बारामतीत गुन्हा दाखल, संत बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत केली फसवणूक

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.