Shocking | ‘आई-पप्पा’ या दोन शब्दांव्यतिरीक्त काहीही बोलता न येणाऱ्या गतीमंद मुलीवर नराधमांचा बलात्कार

Rape on Special Child :दरम्यान, ज्या गतीमंद मुलीवर बलात्कार करण्यात आला तिची ओळख देखील पटली आहे. ही मुलही फक्त आई-बाबा या पलिकडे काहीच बोलू शकत नाही. दरम्यान, आता या गंभीर गुन्ह्याप्रकरणातील आरोपींना...

Shocking | 'आई-पप्पा' या दोन शब्दांव्यतिरीक्त काहीही बोलता न येणाऱ्या गतीमंद मुलीवर नराधमांचा बलात्कार
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 5:28 PM

राजस्थान : देशातील मुलींवर होणारे बलात्कार हा प्रश्न अजूनही तितकाच गंभीर असून आता पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या अलवरमध्ये (Alwar, Rajsthan) घडलेल्या या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका दिव्यांग मुलीवर नराधमींनी बलात्कार केलाय. मानसिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या या गतीमंद (Special Child) फुलीला फारसं काही कळतंही नव्हतं. तिच्यावर बलात्कार केल्याचा घटनेनं एकच खळबळ उडाली असून तिला एका पुलावर फेकून देण्यात आलं होतं. यानंतर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा करणारे नराधम घटनास्थळावरुन पसार झाले आहे. स्थानिकांनी जखमी अवस्थेत असणाऱ्या या अल्पवयीन मुलीला तातडीनं रुग्णालयात दाखल केला. या मुलीच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त वाहत असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची सांगितलं जातंय. आज तकनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. सध्या या मुलीही आयु्ष्याशी झुंज सुरु आहे. तर पोलिस या घटनेप्रकरणी बलात्काराचा (Rape) गुन्हा केलेल्या नराधमांचा कसून शोध घेत आहेत. मात्र अद्याप त्यांचा यश मिळू शकलेलं नाही.

प्रकृती अत्यंत चिंताजनक!

गतीमंद मुलीच्या प्रायव्हेट पार्टवरही गंभीर जखमा झाल्या असल्यानं तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या मुलीला पुढील उपचारासाठी जयपूरमधील रुग्णालयात नेलं जाण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारातही अनेक अडळले येत असल्याचं सांगितलं जातंय.

नराधमांना अटक कधी?

दरम्यान, ज्या गतीमंद मुलीवर बलात्कार करण्यात आला तिची ओळख देखील पटली आहे. ही मुलही फक्त आई-बाबा या पलिकडे काहीच बोलू शकत नाही. दरम्यान, आता या गंभीर गुन्ह्याप्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसही सज्ज झाले आहेत. अलवरच्या पोलीस अधिक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी पाच पथकं तयार केली असून शोध मोहीमही सुरु आहे. मात्र अद्याप पोलिसांनी आरोपींचा कोणताही सुगावा लागू शकलेला नाही.

पीडित गतीमंद मुलगी ही संध्याकाळी पाच वाजल्यापासून बेपत्ता होती. तिच्याशोधासाठी आजूबाजूचा परिसरही नातलगांनी पालथा घातला होता. दरम्यान, या विदारक घटनेनंतर पुन्हा एकदा दिल्लीतील निर्भया बलात्कारप्रकरणाच्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. यानंतर देशात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्कारप्रकरणातील दोषींना शिक्षा होण्यासाठी कठोर कायदाही करण्यात आला. अशातच आता एका अल्पवयीन आणि गतीमंद मुलीवर नराधमांनी केलेल्या अतिप्रसंगाची घटना आणखीनंच हादरवणारी आहे.

संबंधित बातम्या :

भाच्याचा मामीवर बलात्कार, शूटिंग करुन पुन्हा रुमवर येण्यासाठी ब्लॅकमेल, व्हिडीओ पाहून मामाने…

21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, तिघा मित्रांचं अंबरनाथमध्ये दुष्कृत्य

Pune Gang Rape | आधी तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, मग अल्पवयीन तरुणीवर गँगरेप, पुण्यात खळबळ

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.