जेलमधून सुटला, टीव्हीवर रेमडेसिवीरचा तुटवड्याची बातमी बघितली, 12 मेडिकलमध्ये इंजेक्शनची चोरी, पोलिसांकडून बेड्या

वांद्रे पासून बोरवलीपर्यंतच्या अनेक मेडिकलमध्ये रेमडेसिवीरची चोरी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Remdesivir Injection thief arrested in Oshiwara by Kandivali Police)

जेलमधून सुटला, टीव्हीवर रेमडेसिवीरचा तुटवड्याची बातमी बघितली, 12 मेडिकलमध्ये इंजेक्शनची चोरी, पोलिसांकडून बेड्या
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 11:09 PM

मुंबई : मुंबईमध्ये सध्या रेमेडेसिवीर इंजेक्शनची मागणी भरपूर मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याचा फायदा घेऊन वांद्रे पासून बोरवलीपर्यंतच्या अनेक मेडिकलमध्ये रेमडेसिवीरची चोरी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी करणाऱ्या आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर या प्रकरणाचा छळा लावला आहे (Remdesivir Injection thief arrested in Oshiwara by Kandivali Police).

आरोपीची 12 पेक्षा जास्त मेडिकलमध्ये चोरी

पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव करीन साब उल्ला खान असं आहे. विशेष म्हणतो तो अवघ्या 24 वर्षांचा आहे. पण तो कुख्यात चोरटा आहे. त्याने आतापर्यंत वांद्रेपासून बोरीवली पर्यंतच्या 12 पेक्षा जास्त दुकानांमध्ये चोरी केली आहे. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत.

चोराने पोलिसांना काय सांगितलं?

आरोपीने चौकशीत रेमडेसिवीर इंजेक्शन चोरी करण्यामागील कारण सांगितलं. मी न्यूज चॅनलवर रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढल्याचं ऐकलं. हे इंजेक्शन चोरले तर ब्लॅकमध्ये मोठ्या किंमतीत विकू शकतो. त्यामुळेच मेडिकल दुकाने फोडून इंजेक्शनची चोरी केली, असा कबूली जबाब चोरट्याने दिला आहे.

पोलिसांनी चोराला अटक कशी केली?

कांदिवली पोलिसांनी सुरुवातीला सर्व मेडिकलच्या परिसरातील सीसीटीव्ही पाहिले. त्यामध्ये चोरटा एकच असल्याचं निषपण्ण झालं. पोलिसांनी मेडिकल दुकानांच्या आजूबाजूच्या परिसरातीलही सीसीटीव्ही बघितले. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावरच ओशिवरा येथून अटक केली. विशेष म्हणजे चोरटा हा नुकताच जेलमधून सुटून आला होता (Remdesivir Injection thief arrested in Oshiwara by Kandivali Police).

हेही वाचा : हाय प्रोफाईल लोकांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न, वकिलाच्या घरात शिरताच रंगेहाथ बेड्या

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.