एक रेमडेसिवीर इंजेक्शन 35 हजारात, रुग्णालयाच्या वॉर्डबॉयकडूनच काळाबाजार, पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

एक वॉर्डबॉय रुग्णांच्या नातेवाईकांना चढ्या दराने रेमडेसिवीर इंजेक्शन विकायचा (Satara Police arrest four accused who black marketing of Remdesivir Injection)

एक रेमडेसिवीर इंजेक्शन 35 हजारात, रुग्णालयाच्या वॉर्डबॉयकडूनच काळाबाजार, पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 11:48 PM

सातारा : राज्यात दररोज हजारो नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची साहजिकच मागणी वाढली आहे. रुग्णांची संख्याच जास्त असल्याने अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन काही विकृत लोकांकडून रेमडेसिवीरचा सर्रासपणे काळाबाजार केला जात असल्याचं उघड होतंय. या काळाबाजाराला आळा बसावा यासाठी पोलिसांकडून कडक कारवाई सुरु आहे. सातारा जिल्ह्यात अशाचप्रकारे रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये एका रुग्णालयाचा वॉर्डबॉयही आहे (Satara Police arrest four accused who black marketing of Remdesivir Injection).

नेमकं प्रकरण काय?

साताऱ्यातील फलटण शहरातील संबंधित प्रकार आहे. एक वॉर्डबॉय रुग्णांच्या नातेवाईकांना तब्बल 35 हजार रुपयात एक रेमडेसिवीर इंजेक्शन विकायचा. या कामात त्याला इतर आणखी काही साथीदारांची साथ होती. तो इंजेक्शनची किंमत अव्वाच्या सव्वा दरात मागायचा. रुग्णांचे हतबल नातेवाईक त्याला पैसे देऊन टाकायचे. मात्र, त्याच्या या सर्व गैरप्रकाराची माहिती पोलिसांना कळाली. त्यानंतर त्याचा वाईट काळ सुरु झाला. पोलिसांनी अतिशय संयमी आणि शांततेत त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर सापळा रचून त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी कारवाई नेमकी कशी केली?

फलटण शहरातील सुविधा हॉस्पिटलमधील वॉर्डबॉय सुनिल कचरे हा रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या किंमतीने विकत असल्याची माहिती फलटण शहरचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या मोबाईल फोनचा स्पिकर चालू करून समोरून बोलणाऱ्या व्यक्तीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली. समोरील व्यक्तीने एकच रेमडेसिवीर असल्याचे सांगत प्रत्येक बाटलीस 35 हजार रूपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर फलटण पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक तयार करुन त्याच्याकडून एक इंजेक्शन खरेदी करण्यास होकार दर्शविला.

यानुसार अन्न व औषध निरीक्षक अरूण गोडसे आणि फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी फलटण शहरात रेमडेसिवीर विकणाऱ्या व्यक्तीस सापळा रचून ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी सुनिल विजय कचरे, अजय सुरेश फडतरे, प्रविण दिलीप सापते आणि निखिल घाडगे या आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत आहेत (Satara Police arrest four accused who black marketing of Remdesivir Injection).

हेही वाचा : पत्नीला शेवटचं पाहण्यासाठी घालमेल, मालकाकडून सुट्टी देण्यास नकार, शेवटी नोकराने जे केलं त्यावर विश्वास बसणार नाही

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.