Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायकः सावत्र बापाकडून मुलीवर लैंगिक छळ, आईचीही सहमती, वर्षभरापासून धमक्या अन् दहशत, वैजापूरात खळबळ

शेजारी आणि सावत्र बापाचे हे कृत्य मुलीने आईच्या कानावर घातले तेव्हा आईने मुलीची साथ न देता शेजारी जसे सांगतो, तसे कर असे सांगितले. तसेच पीडित मुलीला मारहाण केली.

धक्कादायकः सावत्र बापाकडून मुलीवर लैंगिक छळ, आईचीही सहमती, वर्षभरापासून धमक्या अन् दहशत, वैजापूरात खळबळ
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 3:20 PM

औरंगाबादः अल्पवयीन मुलीवर सावत्र बाप गेल्या वर्षभरापासून लैंगिक छळ (Sexual Abuse of girl) करत असल्याची घटना वैजापूरमध्ये उघडकीस आली आहे. या बापासह आणखी एक जण मुलीवर अत्याचार (Minor girl raped) करत असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली असून या सगळ्या भयंकर प्रकारासाठी मुलीच्या आईचीही सहमती असल्याचे समोर आले आहे. या सावत्र बापासह अन्य एकजण आणि आई या तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

14 वर्षाच्या मुलीवर वर्षभर भयंकर अत्याचार

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील पीडित अल्पवयीन मुलगी 14 वर्षीय असून ती औरंगाबाद येथील एका वसतिगृहात शिक्षण घेत होती. परंतु तिच्या पायाची शस्त्रक्रिा झाल्यामुळे ती शहरातील मोंढा मार्केट परिसरातील तिच्या आईकडे राहण्यासाठी आली होती. ती गेल्या वर्षभरापासून येथे वास्तव्यास होती. परंतु सावत्र बापाची या मुलीवर वाईट नजर होती. तो तिच्यासोबत वारंवार अश्लील चाळे करत होता. एवढेच नव्हे तर शेजारी राहणारा आणखी एक जणही तिचा लैंगिक छळ करत होता.

मुलीने आईला सांगितले तेव्हा….

शेजारी आणि सावत्र बापाचे हे कृत्य मुलीने आईच्या कानावर घातले तेव्हा आईने मुलीची साथ न देता शेजारी जसे सांगतो, तसे कर असे सांगितले. तसेच पीडित मुलीला मारहाण केली.

24 ऑक्टोबरला क्रौर्याची सीमाच गाठली

मुलीवर सतत अत्याचार करणाऱ्या या दोघांनी वर्षभरापासून तिचा छळ केला. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर गेल्या आठवड्यात 24 ऑक्टोबर रोजी बापाने मुलीच्या गुप्तांगात मिरची पूड टाकून क्रौर्याची सीमा गाठली. त्रास होऊ लागल्यावर मुलगी शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील तिच्या मावशीकडे पळून गेली. ती मावशीकडे गेल्यानंतर धमक्या देण्यासाठी इतरांना पाठवले गेले. पण मावशीने त्यांना पिटाळून लावत थेट वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. हा घृणास्पद प्रकार ऐकून पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली. या पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सावत्र बापासह आई व अन्य एकजण अशा तिघांविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या-

रात्रीतून नोटीस लावायला ही काय हुकुमशाही आहे? औरंगाबादेत लेबर कॉलनीचा वाद पेटला, राजकीय पक्ष सरसावले

औरंगाबादमधील लेबर कॉलनीवर फिरणार बुलडोझर, नागरिक संतप्त, कारवाईवर जिल्हाधिकारी ठाम, काय आहे वाद?

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.