Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चोरीची घटना लपवण्यासाठी 9 वर्षाच्या मुलाची हत्या, नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार

नाशिकच्या सामानगाव रोड परिसरात राहणाऱ्या रामजी यादव या 9 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे.

चोरीची घटना लपवण्यासाठी 9 वर्षाच्या मुलाची हत्या, नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 6:21 PM

नाशिक : चोरीच्या घटनेमुळे हत्येचा एक भयंकर प्रकार समोर आला आहे. चोरी भलत्यांनीच केली पण घटना लपण्यासाठी एका 9 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. चोरीची घटना उघडकीस येऊ नये म्हणून नाशिकमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाला ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली आहे. विशेष म्हणजे घरा शेजारी राहणाऱ्या इसमानेच हा प्रकार केल्याने संताप व्यक्त होत आहे. (shocking nine year old boy was killed in Nashik to hide theft incident 2 arrested)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सामानगाव रोड परिसरात राहणाऱ्या रामजी यादव या 9 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत रामजी बाहेर गेला होता. याचवेळी रामजीसोबत असलेल्या इसमाने एका व्यक्तीला चाकू दाखवून लूटमार केली. सदर घटना रामजीने पाहिली होती. हीच घटना तो घरी सांगेल म्हणून शेजारी राहणाऱ्या इसमाने या चिमुकल्याची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विशेष म्हणजे या चिमुरड्याची हत्या केल्यानंतर संशयित आरोपी आपल्या घरी आला. रामजीला मी घरी सोडलं होतं. मात्र, तो कुठे गेला माहिती नाही असं त्याने घरच्यांना सांगितलं. त्यानंतर घरच्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर जेव्हा पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले तेव्हा संपूर्ण सगळं प्रकरण समोर आलं. या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे तर अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. (shocking nine year old boy was killed in Nashik to hide theft incident 2 arrested)

दरम्यान, पोलिसांनी चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर चोरीच्या या घटनेमध्ये मुलाचा नाहक बळी गेल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

इतर बातम्या –

मास्क घालून चोरी, फेसबुक पोस्टमुळे चोरट्याला अटक

नितीन नांदगावकर यांच्या नावावर खंडणी, घराचा ताबा मिळवूण देण्याच्या नावाखाली दीड लाखांना गंडा

(shocking nine year old boy was killed in Nashik to hide theft incident 2 arrested)

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.