गांजा पिऊन हत्या, एकही पुरावा राहू नये म्हणून तीन फोटोही जाळले, श्रद्धा हत्याकांडातील धक्कादायक माहिती समोर

पोलिसांनी आफताबच्या फ्लॅटची झाडाझडती केली. तीन तास पोलिसांनी तपास केला. त्यानंतर दोन काळ्या पिशव्या भरून काही सामान घेऊन गेले. आफताबही पोलिसांच्यासोबत होता.

गांजा पिऊन हत्या, एकही पुरावा राहू नये म्हणून तीन फोटोही जाळले, श्रद्धा हत्याकांडातील धक्कादायक माहिती समोर
गांजा पिऊन हत्या, एकही पुरावा राहू नये म्हणून तीन फोटोही जाळले, श्रद्धा हत्याकांडातील धक्कादायक माहिती समोरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 20, 2022 | 2:23 PM

नवी दिल्ली: श्रद्धा हत्याकांडप्रकरणात पोलिसांच्या हाती अजूनही ठोस पुरावे लागले नाहीत. मात्र, रोज धक्कादायक खुलासे समोर येत आहे. आफताबने पोलिसांसमोर अजून एक कबुली जवाब दिला आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर काय केलं होतं? याची माहितीच त्याने पोलिसांना दिली आहे. ही माहिती ऐकून स्वत: पोलीसही चक्रावून गेले आहेत.

श्रद्धा विषयी निर्माण झालेली घृणा आफताबने पोलिसांना बोलून दाखवली आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर 23 मे रोजी त्याने संपूर्ण फ्लॅट तपासला होता. घरातील श्रद्धाशी संबंधित एक एक वस्तू त्याला नष्ट करायच्या होत्या. इंचभरही पुरावा मागे राहू नये म्हणून त्याने संपूर्ण घराची झाडाझडती घेतली होती, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

हे सुद्धा वाचा

त्याच्या बेडरूममध्ये श्रद्धाचे तीन मोठे फोटो होते. फोटोफ्रेममध्ये हे फोटो होते. श्रद्धानेच ते फोटो लावले होते. उत्तराखंडच्या पिकनिकची आणि 2020मध्ये गेटवे ऑफ इंडियावर काढलेला एक फोटो होता. आफताबने आधी हे तिन्ही फोटोंची फ्रेम तोडली. त्यानंतर तिन्ही फोटोंना आग लावून ते जाळून टाकले.

23 मे रोजी घरातील श्रद्धाच्या वस्तू त्याने बॅगेत भरल्या. ही बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यात श्रद्धाचे कपडे आणि बूट मिळाले आहेत. मात्र, आफताबने स्वयंपाक घरात तिचे तीन फोटो जाळल्याने ते मिळू शकले नाहीत.

आफताब श्रद्धाचा प्रचंड राग राग करत होता. तिची घृणा करत होता. त्याच्या मनात श्रद्धा विषयी इतका राग निर्माण झाला होता की त्याने गांजा पिऊन तिची हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. त्यानंतर हे तुकडे अशा ठिकाणी फेकले की ते पोलिसांना मिळवणं मुश्किल होतंय.

पोलिसांनी आफताबच्या फ्लॅटची झाडाझडती केली. तीन तास पोलिसांनी तपास केला. त्यानंतर दोन काळ्या पिशव्या भरून काही सामान घेऊन गेले. आफताबही पोलिसांच्यासोबत होता.

विशेष म्हणजे तिसऱ्यांदा पोलिसांनी त्याच्या घराची पाहणी केली. यावेळी पोलिसांनी क्राइम सीन रिक्रिएटही केला होता. याशिवाय पोलिसांची पथके उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील जंगलात गेले असून अधिक पुरावे मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.