किरकोळ वादातून तरुणाच्या अंगावर गाडी घालून हत्या, पोलिसांनी तीन तासात आरोपींना ठोकल्या बेड्या

किरकोळ वादातून तरुणावर चारचाकी गाडी घालून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे (six people murdered youth due to minor dispute).

किरकोळ वादातून तरुणाच्या अंगावर गाडी घालून हत्या, पोलिसांनी तीन तासात आरोपींना ठोकल्या बेड्या
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 12:06 PM

ठाणे : किरकोळ वादातून तरुणावर चारचाकी गाडी घालून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिसांनी डोंबिवलीच्या आजदे गावातील सहा आरोपींना अटक केली (six people murdered youth due to minor dispute).

डोंबिवली एमआयडीसीमध्ये एक खाजगी कॅन्टीन आहे. या कॅन्टीनमध्ये काही तरुण पार्टी करण्यासाठी बसले होते. पेंडसेनगर परिसरात राहणारा शशांक महाजन त्याच्या एका मित्रासोबत त्याच कॅन्टीनमध्ये बसला होता. या दरम्यान एका तरुणाशी त्याचा वाद झाला. या वादानंतर शशांक आपल्या मित्रासोबत घरी जाण्यासाठी निघाला. त्याने घरी जाण्यासाठी ओला गाडी बुक केली. ओला गाडीची बराच वेळ वाट बघितल्यानंतर त्याने पायी घराकडे जाण्याचा निर्णय घेतला.

शशांक आणि त्याचा मित्र हे दोघी पायी घराकडे निघाले. ज्या तरुणासोबत शशांकचा वाद झाला होता तो तरुण लाल रंगाच्या कारमध्ये बसून त्याच्या मित्रांसोबत शशांकच्या मागे आला. शशांकला आधी वाटले की, त्याने बुक केलेली ओला कार येत आहे. मात्र त्या कारमध्ये सहा तरुण बसले होते. या तरुणांनी शशांक आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली, शशांकला रस्त्यावर पाडले, चारचाकी गाडी त्याच्या अंगावर घातली. त्यानंतर सहा जण कारमध्ये बसून पळून गेले.

मानपाडा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस अधिकारी सुरेश डांबरे यांचे पथक घटनास्थळी पोहचले. जखमी शशांकला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तात्काळ रुग्णाहिकीचे किंवा इतर गाडीची गरज होती. दरम्यान, काही सोय न झाल्याने अखेर पोलिसांनी जखमी शशांकला त्यांच्या गाडीत टाकून रुक्मीणीबाई रुग्णालयाला नेलं. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. गाडी रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच शशांकचा मृत्यू झाला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा हरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. एका ठिकाणी लागलेल्या सीसीटीव्हीत लाल रंगाची गाडी जाताना दिसली. या गाडीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश डांबरे आणि त्यांच्या पथकाला आरोपीचा सुगावा लागला (six people murdered youth due to minor dispute).

घटना घडल्याच्या तीन तासाच्या आत आरोपी सचिन पाटील, विनोद म्हात्रे, विनय लंके, निखिल सावंत, विक्रांत तांडेल आणि रोहित गुरव यांना पोलिसांना बेड्या ठोकल्या, अशी माहिती डोंबिवली एसीपी जे. डी. मोरे यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरिक्षक बाळासाहेब पवार करीत आहेत.

हेही वाचा : मुख्यमंत्री डोंबिवलीचे जावई, त्यांनी प्रदुषणावर लक्ष घालावं, आता अधिकाऱ्यांना धुण्याची वेळ, मनसेचा इशारा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.