स्वतःची बाईक चोरीला गेली म्हणून 29 बाईक चोरल्या! सोलापूरंय औ ते, इषयच नाय काय?

सोलापूर क्राईम ब्रांच पोलिसांनी एका संशयित चोरट्याचा तपास सुरु केला होता. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्या इतर साथीदारांची कसून चौकशी सुरु केली. यानंतर या चोरट्याच्या अन्य दोघा जणांची माहिती मिळवत पोलिसांनी त्यांनाही अटक केली.

स्वतःची बाईक चोरीला गेली म्हणून 29 बाईक चोरल्या! सोलापूरंय औ ते, इषयच नाय काय?
चोरी केलेल्या दुचाकीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 12:34 PM

सोलापूर : एखादी गोष्ट चोरीला गेली म्हणून कुणी त्याच गोष्टींची चोरी करत फिरतं का? असा प्रश्न ही बातमी वाचण्याआधी तुम्हाला कुणी विचारला असता, तर तुम्ही नाहीच उत्तर दिलं असतं. पण ही बातमी वाचल्यानंतर तुम्हाला ‘असं होऊ शकतं’, यावर विश्वास ठेवावा लागेल. सोलापूरमध्ये (Solapur Crime news) एका पठ्ठ्याने त्याची बाईक चोरीला गेली म्हणून एक दोन नव्हे तर तब्बल 29 बाईक चोरल्यात. या बाईकचोरासह (Bike Theft) त्याच्या अन्य साथीदारांनाही पोलिसांनी अटक (Police arrest) केली आहे. सध्या याप्रकरणी पुढील तपास केला जातोय.

सोलापूर पोलिसांनी नुकताच दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. या वाहन चोरणाऱ्या टोळीकडून तब्बल 29 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. सोलापूर मार्केट यार्ड परिसरात गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याच टोळीने मार्केट यार्डात दुचाकी चोरट्याचा सपाटा लावला होता. अखेर सोलापूर पोलिसांच्या क्राईम ब्रांचने या टोळीच्या मुसक्या आवळल्यात.

पाहा LIVE घडामोडी :

हे सुद्धा वाचा

सोलापूर क्राईम ब्रांच पोलिसांनी एका संशयित चोरट्याचा तपास सुरु केला होता. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्या इतर साथीदारांची कसून चौकशी सुरु केली. यानंतर या चोरट्याच्या अन्य दोघा जणांची माहिती मिळवत पोलिसांनी त्यांनाही अटक केली. एकूण तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून त्यांनी चोरी केलेल्या दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्यात. तब्बल 29 दुचाकी या तिघा जणांच्या टोळीने चोरल्या होत्या.

विशेष म्हणजे या टोळीच्या म्होऱ्यक्याचं वाहन मार्केट यार्ड परिसरातून चोरीला गेलं होतं. त्यामुळे रागापोटी त्याने इतर साथीदारांच्या मदतीने एक-दोन नव्हे तर तब्बल 29 मोटारसायकली चोरल्याची कबुली दिलीय. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत एकूण 8 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ,सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी या संपूर्ण चोरीप्रकरणाची माहिती दिली.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....