#क्राईम_किस्से : मुंबईतल्या प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाशी आधी दोस्ती, किडनॅप करत 2 लाखांची खंडणी, नंतर थेट हत्या
सोशल मीडिया हे अमर्यादित असं माध्यम आहे. इथे कुणीही कुणासोबतही मैत्री करु शकतं. पण सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करण्याआधी ती व्यक्ती चांगली आहे की नाही याची दहावेळा खारतजमा करुनच मैत्री करावी.
मुंबई : सोशल मीडिया हे अमर्यादित असं माध्यम आहे. इथे कुणीही कुणासोबतही मैत्री करु शकतं. पण सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करण्याआधी ती व्यक्ती चांगली आहे की नाही याची दहावेळा खारतजमा करुनच मैत्री करावी. कारण काही इसम मैत्रीच्या नावाने आपल्याशी ओळख निर्माण करतात. एकदा ओळख झाली की ते आपल्या पाठीत खंजीर खुपसतात.
विशेष म्हणजे सायबर गुन्हे सध्या गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत. पण आम्ही ज्या घटनेची माहिती देणार आहोत ती 2007 मध्ये घडली आहे. काही आरोपींनी मुंबईतील एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाशी सोशल मीडियावर मैत्री केली. त्यानंतर त्याला गोड बोलून भेटायला बोलवत किडनॅप केलं. त्याच्या कुटुंबियांकडे 2 कोटींची खंडणी मागितली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेल्याचा संशय आल्यावर मुलाची हत्या केली.
नेमकं प्रकरण काय?
आम्ही आज तुम्हाला अदनान पटरावाला हत्याकांडाची माहिती देणार आहोत. मुंबईत प्रसिद्ध बिल्डर असलम पटरावाला यांच्या 16 वर्षीय अदनान पटरावाला याची 19 ऑगस्ट 2007 रोजी हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे आरोपींनी आधी अदनानसोबत सोशल मीडियावर मैत्री केली. तिथे त्यांनी ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांनी अदनानला भेटण्यासाठी बोलवत अपहरण केलं. त्यांनी अदनानच्या वडिलांना फोन करुन 2 कोटींची खंडणी मागितली. पण त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केली, अशी भीती त्यांना वाटली. त्याच भीतीतून त्यांनी अदनानची हत्या केली. खंडणीच्या फोनच्या दुसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांना अदनानचा मृतदेह नवी मुंबईच्या पामबीच रोडजवळ सापडला होता.
आरोपींना हत्या करायची नव्हती, पण…
एका प्रसिद्ध बिल्डरच्या अल्पवयीन मुलाची अशाप्रकारे हत्या करण्यात आल्याने त्यावेळी प्रकरण प्रचंड गाजलं होतं. पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक करुन शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली होती. या घटनेबद्दल त्यावेळी अनेक चर्चा रंगल्या होत्या. यापैकी एक म्हणजे आरोपींना अदनान याची हत्या करायची नव्हती. त्यांनी 18 ऑगस्ट 2007 रोजी अदनानचं अपहरण केलं होतं. त्यांनी अदनानच्या कुटुंबियांकडे दोन कोटींची मागणी केली होती. पण दुसऱ्या दिवळी वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी फुटली. त्यामुळे आरोपींनी भीतीने अदनानची हत्या केली, अशी देखील माहिती समोर आली होती.
आधी पाच जणांना अटक, नंतर चौघांची सुटका
याप्रकरणात पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या होत्या. पण तरीही पोलिसांकडे योग्य पुरावे उपलब्ध नव्हते. हे प्रकरण कोर्टात अनेक वर्ष चाललं. अखेर कोर्टाने पुराव्याअभावी चार आरोपींची सुटका केली. तर एका अल्पवयीन मुलावर बालन्याय मंडळाने खटला चालवला होता. विशेष म्हणजे या प्रकरणाचा खटला अनेक वर्ष सुरु होता.
हेही वाचा :
ती फक्त माझीच होणार, मुलीसाठी दोस्ती तोडली, धारदार शस्त्राने हत्या, नागपूर हादरलं