अंडरवर्ल्डकडून गुलशन कुमारांची निर्घृण हत्या, बॉलिवूडची भळभळती जखम, गुन्हेगार अनेक, शिक्षा एकालाच

गुलशन कुमार यांची कहाणी दिल्लीतून सुरु होते. त्यांच्या वडिलांचं दिल्लीतील दर्यागंजमध्ये ज्यूसचं दुकान होतं. गुलशन कुमार लहानपणी ज्यूसच्या दुकानावर बसायचे.

अंडरवर्ल्डकडून गुलशन कुमारांची निर्घृण हत्या, बॉलिवूडची भळभळती जखम, गुन्हेगार अनेक, शिक्षा एकालाच
गुलशन कुमार
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 7:50 AM

मुंबई : टी सिरीज  (T Series) या म्युजिक कंपनीची स्थापना करणारे दिवंगत गायक गुलशन कुमार यांची हत्या ही त्यांच्या प्रत्येक चाहत्यासाठी भळभळती जखम आहे. गुलशन यांचा साधा चेहराच त्यांच्या साधेपणाची ओळख करुन द्यायचा. त्यांना देवाची पूजा करायला खूप आवडायचं. ते स्वत: एक भाविक होते. त्यांची वैष्णव देवीवर खूप श्रद्धा होती. त्याचबरोबर ते प्रचंड दानशूरही होते. त्यांची कपंनी टी सिरीज आजही जम्मूतील वैष्णव देवीच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या भंडाऱ्याचा खर्च करते. गुलशन कुमार यांच्या भावगीतांचे देशभरात लाखो चाहते आहेत.  त्यांची टी सिरीज 90 च्या काळापासूनच प्रचंड फॉर्ममध्ये होती. सारं काही सुरळीत सुरु असताना त्यांची अचानक हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. याच घटनेविषयी संपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

गुलशन कुमार यांचा ज्यूस विक्रेता ते संगीत सम्राट बनवण्यापर्यंतचा प्रवास

गुलशन कुमार यांची कहाणी दिल्लीतून सुरु होते. त्यांच्या वडिलांचं दर्यागंजमध्ये ज्यूसचं दुकान होतं. गुलशन कुमार लहानपणी ज्यूसच्या दुकानावर बसायचे. कालांतराने त्यांच्या वडिलांनी एक मोठं दुकान खरेदी केलं. या दुकानात त्यांनी कॅसेट आणि टेप विकणं सुरु केलं. हळूहळू त्यांनी टेप दुरुस्त करण्याचंदेखील काम हाती घेतलं. दुकान बऱ्यापैकी सुरु होतं.

म्युजिक इंडिस्ट्रित काम करण्याची कल्पना

यावेळी गुलशन कुमार यांना म्युजिक इंडिस्ट्रित काम करण्याची कल्पना सुचली. ते स्वस्तात कॅसेट बनवू लागले. त्यांनी धार्मिक गाण्यांपासून सुरुवात केली. जे गायक मंदिरात किंवा भजनात भजन म्हणायचे त्यांच्या आवाजात भजन रेकॉर्ड करुन त्यांची कॅसेट विकण्यास सुरुवात केली. त्यावेळी गुलशन कुमार स्वस्तात भजनाच्या कॅसेट विकायचे. हळहळू या कॅसेट्सला प्रसिद्धी मिळू लागली. काही गायकांचे आवाज लोकांना आवडू लागली.

गायक प्रसिद्धीच्या झोतात

टी सिरीजचे कॅसेट खूप स्वस्त होत्या. त्यामुळे लोक जास्त खरेदी करु लागले. यादरम्यान अनेक गायकांचे आवाज खूप प्रसिद्ध झाले. यामध्ये अनुराधा पौडवाल, सोनू निम, कुमार शानू, शब्बीर कुमार, मुन्ना अजिज हे प्रसिद्ध झाले. या दरम्यान गुलशन कुमार यांनी म्युजिक डायरेक्टरला संधी देण्यास सुरुवात केली. ते देखील प्रसिद्ध झाले. यामध्ये नदिम-श्रवण ही जोडी देखील चांगली प्रसिद्ध झाली. गुलशन कुमार यांनी मुंबईत म्युजिक इंडस्ट्रित पायमुळे घट्ट रोवले. 1990 च्या काळात तर टी सिरीज खूप मोठी म्युजिक कंपनी म्हणून उदयास आली. अनेक चित्रपटांचे गाणी याच कंपनीकडून बनवले जायचे. कंपनीचं जवळपास 350 कोटींचे टर्नओव्हर झालं होतं. विशेष म्हणजे 1993 मध्ये गुलशन कुमार हे  सर्वाधिक टॅक्स भरणारे उद्योगपती ठरले होते.

नदिम सैफीसोबत संबंध ताणले गेले

यादरम्यान नदिम सैफी आणि गुलशान यांच्यातील संबंध ताणले गेले. नदीम-श्रवण यांनी दोघांनी मिळूण ‘हाय जिंदगी’ नावाचा अल्बम बनवला होता. या अल्बममध्ये काही गाणे हे नदिमने गायली होती. पण त्याचा आवाज चांगला नव्हता. तरीही गुलशन कुमार यांनी त्यांचे गाणे टी सिरीजच्याद्वारे प्रमोट केले. पण ते गाणे फारसे चालले नाहीत. दुसरीकडे नदीम-श्रवण आता प्रख्यात म्युजिक डायरेक्टर झाले होते. गुलशन कुमार हे नवोदितांना चांगली संधी द्यायचे. पण चित्रपट हे टी सिरीजला जास्त भेटायचे. आता त्या चित्रपटात दुसरे म्युजिक डायरेक्टर राहू लागले. यामुळे नदिम आणि गुलशन कुमार यांच्यातील मतभेद आणखी वाढले. गुलशन कुमार हे आपल्या करिअरमध्ये अडचणी आणत आहेत, असं नदिमला वाटायला लागलं.

गुलशन कुमार यांना अंडरवर्ल्डमधून पहिला कॉल

यादरम्यान 1996 मध्ये गुलशन कुमार यांना अंडरवर्ल्डमधून पहिला फोन आला. कुख्यात गुंड अबू सालेम याने त्यांच्याकडून खंडणी मागितली होती. गुलशम कुमार यांनी पहिल्यांदा भीतीपोटी काही कोटी रुपयांची खंडणी देखील दिली होती. नदिमचे अंडरवर्ल्डशी संबंध होते. विशेष करुन अबू सालेम आणि दाऊद इब्राहिमचा भाऊ असलेला अनिस इब्राहिम याच्याशी चांगले संबंध होते. नदिमने अबू सालेमला फोन केला आणि गुलशन कुमारला धमकावण्यास सांगितलं. तसेच आपले अल्बम प्रमोट करण्यासाठी दबाव आणण्यास सांगितलं.

अबू सालेमचा दुसऱ्यांदा फोन

त्यानंतर अबू सालेमने गुलशन कुमारला फोन करुन 10 कोटींची मागणी केली. गुलशन कुमार यांनी दुसऱ्यावेळी पैसे दिले नाहीत. अबू सालेमने 5 ऑगस्ट 1997 रोजी गुलशन कुमार यांना पुन्हा फोन केला. तू पैसेही देत नाहीत आणि पोलिसातही तक्रार केलेली नाही. तू अंडरवर्ल्डला हलक्यात घेत आहेस. त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, अशी धमकी त्याने दिली. त्यामुळे गुलशन कुमार विचारात पडले. त्यांनी भाऊ क्रिशन कुमार यांना सांगितलं. यावेळी त्यांच्या भावाने पोलिसात जाण्यास सांगितलं. पण पोलिसात गेलो तर गुंड आणखी वेगळं काही करुन बसतील, अशी भीती किशोर कुमार यांना वाटत होती.

गुलशन कुमार यांची भर दिवसा हत्या

अखेर तीन दिवसांनी अबू सालेमने पुन्हा गुलशन कुमार यांना फोन केला. नदिमच्या म्युजिक अल्बमला प्रमोट कर. तसेच पैसे दे, असं सांगितलं. 8 ऑगस्टला धमकी मिळाल्यानंतर 12 ऑगस्टला जुहू येथे एका मंदिरात गुलशन कुमार दररोज जायचे. त्या मंदिराजवळ तीन शार्फ सूटरने मिळून गुलशन कुमार यांच्या अंगावर एकामागे एक अशा 16 गोळ्या झाडतात. या हल्ल्यात गुलशन कुमार यांचं निधन झालं.

पोलिसांचा उलगडा, आरोपींना बेड्या

गुलशन कुमार यांची मुंबईत हत्या झाली होती. त्यांच्या पार्थिवावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळी कुमार सानू, अनुराधा पौडवाल, सोनू निगम असे अनेक गायक तिथे उपस्थित होते. पण त्यांच्या अंत्यविधीच्यावेळी नदिम सैफी गैरहजर होता. गुलशन कुमार यांच्यामुळेच नदिम-श्रवण हे यशाच्या शिखरावर पोहोचले. पण नदिम अंत्यविधीत गैरहजर राहिल्याने अनेक चर्चा सुरु झाल्या.

आधी दोघांना बेड्या

पोलिसांचा तपास सुरु झाला. तपासादरम्यान पोलिसांनी 16 ऑगस्टला अंडरवर्ल्डशी संबंधित दोन आरोपींना पकडलं. जावेद आणि रफीक अशी दोघांची नावे होती. ते दोघं अबू सालेमच्या गँगशी संबंधित होते. त्या दोघांची जेव्हा चौकशी होते तेव्हा ते आपला गुन्हा कबूल करतात. तसेच ते सर्व माहिती देतात.

गुलशन कुमारांच्या हत्येचा दोन महिन्यांआधीच कट आखलेला

घटनेच्या दोन महिन्यांआधी म्हणजेच मे 1997 मध्ये दाऊद इब्राहिमचा लहान भाऊ अनिस इब्राहिम याच्या कार्यालयात एक मीटिंग झाली होती. या बैठकीत अनिस इब्राहिम, अबू सालेम आणि कयूम नावाचा एक गुंड होता. या बैठकीत त्यांनी गुलशन कुमार आपल्या गोष्टी ऐकत नसल्याच्याबाबत चर्चा केली. त्याच बैठकीत गुलशन कुमारची हत्या करण्याचा कट आखण्यात आला. यासाठी तीन किलरची निवड करण्यात आली. त्यानंतर तिघांनी गुलशन कुमार यांची हत्या केली.

दाऊद मर्चंटलाही बेड्या

गुलशन यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांपैकी एकाचं नाव दाऊद मर्चंट असं होतं. तो दाऊद आणि अबू सलेमचा खास होता. पोलीस त्याला अटक करते. त्याच्या अटकेनंतरही तो तीच कहाणी सांगतो. पण गोळीबार केलेल्यांपैकी दोन इतर शार्फ शूटरला पोलीस अटक करतात तेव्हा आणखी धक्कादायक माहिती समोर आली. गुलशन कुमार यांची हत्या केल्यानंतर या तीनही गोळीबारांना टीप्स म्युजिक इंडस्ट्रिचे मालिक असलेले रमेश तुरानी यांनी दिले, अशी माहिती समोर आली. पण पुढे कोर्टात ही माहिती पुराव्याअभावी खरी ठरु शकली नाही.

शिक्षा फक्त एकाला, इतरांना पुराव्याअभावी सोडलं

रमेश तुरानी इंडस्ट्रिमधलं हे खूप मोठं नाव आहे. त्यानंतर पोलिसांनी रमेश तुरानीला देखील अटक केली. रमेश तुरानी आणि तीन शूटर असे पकडून एकूण 19 जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर खटला सुरु झाला. 2001 मध्ये दाऊद मर्चंट याला सेशन कोर्टाने जन्मठेपाची शिक्षा ठोठावली. त्याने दुसऱ्याच्या सांगण्यावरुन हत्या केली. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा सुनावत नाही आहोत, असं कोर्टाने स्पष्ट केलं होतं. पण दाऊद मर्चंट वगळता इतर 18 जणांना कोर्टाने पुराव्याअभावी सोडून दिलं होतं.

मुख्य आरोपींवर कारवाई शेवटी नाहीच

या प्रकरणातील मुख्य आरोपी नदिन सैफी आणि अबू सालेम हे तेव्हा अटकेत आलेच नाहीत. दुसरी गोष्ट अबू सालीम याचं पोर्तूगालमधून भारतात प्रत्यार्पण झालंय पण त्याच्यावर गुलशन कुमार प्रकरणी कोणताही खटला सुरु केला गेला नाही. कारण तिथल्या सरकारने 1993 बॉम्बस्फोट प्रकरणावरुन त्याचं भारतात प्रत्यार्पण केलं होतं. दुसरा आरोपी नदिम हा ब्रिटनमध्ये स्थायिक झाला. तिथल्या कोर्टाने पुरावे योग्य नसल्याचं म्हणत त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी फेटाळली. गुलशन कुमार यांची हत्या झाली तेव्हा नदिमची गर्भवती पत्नी ही ब्रिटनमध्ये होती. हत्येनंतर नदिम हा देखील ब्रिटनला पळून गेला. त्यानंतर तो भारतात आलाच नाही.

संबंधित बातम्या : 

देशातली खरतनाक सीरियल किलर, महिला असूनही इतकी दुष्ट? वाचा सायनाईड मल्लिकाच्या गैरकृत्यांची कहाणी

मोठमोठे नेते-मंत्र्यांना वेश्या पुरवायचा, दारुचा धंदा ते सेक्स रॅकेट, 80 चं दशक दणाणून सोडणारा ऑटो शंकर

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...