देशातली खरतनाक सीरियल किलर, महिला असूनही इतकी दुष्ट? वाचा सायनाईड मल्लिकाच्या गैरकृत्यांची कहाणी

स्त्रियांकडे आपण आदराने बघतो. भारतीय संस्कृतीत महिलांना देवीची उपमा दिली जाते. एक स्त्री आपल्या कुटुंबासाठी दिवस-रात्र झटते. मुला-बाळांसांठी काम करते. त्यांच्या भविष्याचा चांगला विचार करते. त्यामुळे महिलांचा समाजात आदर केला जातो. पण काही महिला याला अपवाद असतात.

देशातली खरतनाक सीरियल किलर, महिला असूनही इतकी दुष्ट? वाचा सायनाईड मल्लिकाच्या गैरकृत्यांची कहाणी
सायनाईड मल्लिका
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 8:26 AM

मुंबई : प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक हळूवार संवदेनशीलपणा असतो. मनाचा हा संवेदनशील कोपरा खूप भोळा असतो. आयुष्याच्या जडणघडणीत कधी कुणी ठेच पोहोचवली तर मनाचा हा संवेदनशील कोपरा अश्रूंनी ओला होता. अशा प्रसंगांमधून माणूस आतून खचतो. आपलं हे संवेदनशील मन आणि भोळा स्वभाव आपल्यातला एक चांगला माणूस जिवंत असल्याचं दाखवून देतो. पण आपल्या या हळव्या मनामुळे कधीकधी आपलं खूप नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे सावध राहणं जास्त आवश्यक आहे. समाजात वावरत असताना शेकडो माणसं हे खोटे चेहरे घेऊन फिरत असतात. त्यांचे मुखवटे खोटे असतातच पण ते माणूस म्हणून ही खूप दुष्ट असतात. त्यामुळे कधीही दुसऱ्याकडे आपलं दु:ख सांगण्याआधी ती व्यक्ती त्या पात्रतेची आहे ना याची नेहमी खातरजमा करा. कारण त्याचा फायदा घेऊन नंतर ते तुम्हालाच त्रास पोहोचवतात. याच गोष्टीशी संबंधित एका महिला सीरियल किलरची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

स्त्रियांकडे आपण आदराने बघतो. भारतीय संस्कृतीत महिलांना देवीची उपमा दिली जाते. एक स्त्री आपल्या कुटुंबासाठी दिवस-रात्र झटते. मुला-बाळांसांठी काम करते. त्यांच्या भविष्याचा चांगला विचार करते. त्यामुळे महिलांचा समाजात आदर केला जातो. पण काही महिला याला अपवाद असतात. त्या समाजासाठीच शाप ठरतात. आम्ही आज तुम्हाला अशाच एका निर्दयी महिलेची महिती देणार आहोत. या महिलेने दागिने चोरी करण्यासाठी चक्क महिलांना सायनाईड खाऊ घालून जीवे मारले. विशेष म्हणजे देवाधर्माच्या नावाने तिने महिलांना जाळ्यात ओढून हे सर्व कृत्य केलं. या सिरिअल किलर महिलेचं नाव के. डी. केंपम्मा असं आहे. पण ती सायनाईड मल्लिका म्हणून कुप्रसिद्ध आहे. तिची स्टोरी सांगण्यामागचं खरं कारण हेच की आपल्या आजूबाजूला असे हजारो शेकडो माणसं खोटे मुखवटे घेऊन फिरत असतात. त्यांना ओळखा आणि सावध व्हा. आपण भोळेपणात त्यांना आपली दु:ख सांगतो. त्याचा फायदा घेऊन ही खोटी माणसं आपलं नुकसान करतात.

सायनाईड मल्लिका स्त्रियांना भावनिक गोष्टीत गुंतवायची

आम्ही ज्या क्रूर महिलेविषयी सांगत आहोत तिचं खरं नाव के. डी. केंपम्मा असं आहे. या केंपम्माने अनेक महिलांचा जीव घेतलाय. तिच्या क्रूर कृत्याच्या अनेक कहाण्या 2007 मध्ये प्रचंड गाजल्या होत्या. ही केंपम्मा श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय महिलांना मंदिरांमध्ये हेरायची. त्यांच्याशी गोड बोलून त्यांचे दु:ख समजून घ्यायची. त्यांना भावनिक गोष्टींमध्ये गुंतवायची. नंतर शहर-गावाबाहेर कुठल्यातरी मंदिरात किंवा महिलांच्या घरात पुजेच्या नावाने फसवायची. ती महिलांना तीर्थ प्रसाद म्हणून जबरदस्ती सायनाईड खायला लावायची. त्यानंतर महिलांचा मृत्यू झाला की त्यांच्या गळ्यातील किंवा अंगावरील सर्व दागिने लंपास करायची. पण अखेर 2007 मध्ये ती पकडली गेली. त्यानंतर तिचे गैरकृत्य उघड झाले. केंपम्मा महिलांना सायनाईड खाऊ घालून मारायची त्यामुळेच तिला सायनाईड मल्लिका नाव पडलं.

सायनाईड मल्लिका विषयी माहिती

केंपम्मा उर्फ सायनाईड मल्लिका ही मुळची कर्नाटकाची. कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरु जवळील काग्गलीपुरा हे तिचं गाव. या केंपम्मा हिचा नवरा व्यवसायाने टेलर होता. तर तिचा चिट फंडचा व्यवसाय होता. पण त्या व्यवसायात तिचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे तिच्या पतीने तिला रागाच्या भरात घराबाहेर काढलं. त्यावेळी केंपम्मा हिला मुलबाळ नव्हतं. पतीने घराबाहेर काढल्यानंतर तिने अनेक ठिकाणी कामवालीबाई किंवा सोनाराकडे मदतनीस म्हणून काम केलं. या दरम्यान तिने अनेक ठिकाणी चोऱ्यामोऱ्या केल्या. सोनाराकडे काम करताना तिचं सायनाईडर सोबत ओळख झाली. सोनार सोनं साफ करण्यासाठी या द्राव्याचा वापर करायचे. पण ते पिलं तर माणूस मरतो हे तिला ठावूक झालं. याच महितीचा वापर करुन तिने हत्येचं सत्र सुरु केलं.

देवळात जावून महिलांना फसवलं

सायनाईड मल्लिका ही नंतर देवळात जाऊ लागली. तिथे आलेल्या हतबल महिलांना गाठायची. आपल्याला धार्मिक कार्यक्रम, पुजा-पाठची खूप माहिती आहे, असं ती महिलांना दाखवायची. त्यानंतर देवाच्या नावाने ती त्या महिलांशी संपर्क करायची. त्यांना भावनिक गोष्टींमध्ये गुंतवायची. हळहळू त्यांच्याशी जवळीक वाढवायची. त्यानंतर आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्यातरी पूजेची माहिती महिलांना द्यायची. घराबाहेर किंवा शहराबाहेर असलेल्या एखाद्या मंदिरात ती पूजेचं आयोजन करायची. तिथे ती महिलांना सायनाईड तीर्थ म्हणून पाजवायची. नंतर महिलांचा मृत्यू झाल्यानंतर महिलांच्या अंगावरील दागिने पळवायची. त्यानंतर ती दुसरीकडे राहायला जायचे. तिथे नवीन व्यक्ती आणि नवं नाव घेऊन वावरायची आणि पुन्हा एखाद्या महिलेला जाळ्यात ओढायची.

सायनाईड मल्लिकाला जन्मठेपेची शिक्षा

या सायनाईड मल्लिकाने ऑक्टोबर 1999 मध्ये पहिला खून केला होता. विशेष म्हणजे 2007 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यात तिने चक्क पाच खून केले होते. मृतक महिला या 30, 52 तसेच 60 वयाच्या होत्या. 2007 मध्ये चोरीचं सोनं विकल्याप्रकरणी ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली होती. त्यावेळी पोलिसांना तिच्याजवळ काही महिलांचे दागिने सापडले होते. त्यावेळी केलेल्या चौकशीत सहा महिलांचा तिने खून केल्याचं उघड झालंल होतं. तिला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. पण पुढे खटला सुरु असताना परिस्थितीजन्य पुरावे असल्याकारनाने तिच्या फाशीच्या शिक्षेचं रुपांतर जन्मठेपेत करण्यात आलं होतं.

हेही वाचा : 90 च्या काळातलं मुंबईला हादरवणारं दुहेरी हत्याकांड, पोलिसांनाही जमलं नाही ते देशाच्या पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडीत यांनी करुन दाखवलं

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.