Kalpesh Maru | दादरचे प्रसिद्ध सुविधा शोरुमचे संचालक कल्पेश मारु यांची आत्महत्या, यापूर्वीही आयुष्य संपवण्याचे 4 प्रयत्न, पोलिसांचा अंदाज काय?

कल्पेश मारू हा मानसिक रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या आगोदर ही कल्पेश याने 4 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही त्याने एकावेला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता त्याला वाचविण्यात यश आले होते.

Kalpesh Maru | दादरचे प्रसिद्ध सुविधा शोरुमचे संचालक कल्पेश मारु यांची आत्महत्या, यापूर्वीही आयुष्य संपवण्याचे 4 प्रयत्न, पोलिसांचा अंदाज काय?
कल्पेश मारू यांनी आत्महत्या केली आहे.
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 6:06 PM

दादर : (Dadar) दादर येथील सुविधा शोरुमचे संचालक कल्पेश मारु यांनी (Suicide) आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुंबई- अहमदाबाद मार्गावरील शिरसाट फाट्याजवळ त्यांचा मृतदेह हा आढळून आला आहे. आत्महत्येची घटना ही दोन दिवसांपूर्वीच घडली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात दोन दिवसानंतर (Identification of the body) मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह कल्पेश मारु यांचाच असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पण आत्महत्येचे नेमके कारण काय हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पण कल्पेश हे मानसिक रुग्ण होते आणि यापूर्वी त्यांनी आत्महत्या कऱण्याचा प्रयत्नही केला होता. त्यांच्या अशा टोकाच्या पावलानंतर सर्वानांच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे.

मानसिक रुग्ण असल्याचे माहिती

कल्पेश मारू हा मानसिक रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या आगोदर ही कल्पेश याने 4 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही त्याने एकावेला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता त्याला वाचविण्यात यश आले होते अशी माहिती ही समोर आली असल्याचे मांडवी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल वाघ यांनी दिली आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट, पोलीसांकडून तपास सुरु

दादर येथील सुविधा शोरुमचे संचालक कल्पेश मारु यांचा मृतदेह महामार्गावर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 46 वर्षीय कल्पेश हे सुविधा शोरुमचे संचालक होते. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर त्यांचा मृतदेह हा आढळून आला आहे. घटनेमागेच नेमके कारण हे अद्यापही समोर आलेले नाही. दादर पोलीसांनी घटनेची नोंद करुन घेतली असून पुढील तपास सुरु आहे. दादर मधील प्रसाद व्यापारी आणि सुविधा स्टोअर चे मालक शांतीलाल मारू यांचा ते मुलगा होत. मारू कुटुंबीय हे शिवाजीपार्क दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. त्यांच्याशी पोलिसांनी चौकशी करून खात्री करून घेतलीं आहे.

हे सुद्धा वाचा

यामुळे पटली मृतदेहाची ओळख

मृतदेहाला लागूनच एक थम्सची बॉटल, एक बॅग पोलिसांना सापडली असून, त्यात बॅग मध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, आय फोन, व एक गोळ्यांचे रिकामे पॉकेट मिळून आले होते. यावरून त्याची ओळख पटली आहे. ओळख पटल्यानंतर घटनेची माहिती पोलीसांनी त्यांच्या नातेवाईकांना दिली होती.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.