हाडांच्या कर्करोगाने ग्रासलेल्या चिमुरड्याची तडफड, वडिलांनी ‘विष’ दिले

आरोपी वडील पेरियासामी याचा 14 वर्षांचा मुलगा वन्नाथामिझान हा गेल्या एक वर्षापासून हाडांच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. आपला मुलगा रात्रंदिवस वेदनेने विव्हळताना पाहून पेरियासामी याचे हृदय तीळतीळ तुटत होते.

हाडांच्या कर्करोगाने ग्रासलेल्या चिमुरड्याची तडफड, वडिलांनी 'विष' दिले
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 1:29 PM

चेन्नई : हाडांच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या 14 वर्षांच्या मुलाला त्याच्याच वडिलांनी ‘विष’ देऊन जीवे ठार मारले. तामिळनाडूतील सालेममध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांसह 3 जणांना अटक केली आहे. वडिलांनी पोटच्या मुलाला तीन औषधांचे मिश्रण असलेले इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी वडील पेरियासामी याचा 14 वर्षांचा मुलगा वन्नाथामिझान हा गेल्या एक वर्षापासून हाडांच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. आपला मुलगा रात्रंदिवस वेदनेने विव्हळताना पाहून पेरियासामी याचे हृदय तीळतीळ तुटत होते. प्रयोगशाळा चालवणाऱ्या व्यंकटेशनशी पेरियासामीने संपर्क साधला. पेरियासामीने वेंकटेशनला आपल्या मुलाचा त्रास कसा कमी करता येईल, याबद्दल विचारले.

तीन औषधांच्या मिश्रणाचे इंजेक्शन

पेरियासामी आणि वेंकटेशन यांनी प्रभू नावाच्या वैद्यकीय चिकित्सकाशी संपर्क साधला. प्रभू पेरियासामी याच्या घरी आला आणि त्याने 14 वर्षांच्या कॅन्सरग्रस्त वन्नाथामिझन याला एक इंजेक्शन दिले, ज्यानंतर तो मृत्युमुखी पडला. पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की प्रभूने तीन औषधांचे मिश्रण इंजेक्शनमधून दिले होते, ज्याच्या ‘ओव्हरडोस’मुळे मुलाचा मृत्यू झाला.

आरोपी वडिलांसह तिघांना अटक

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, पेरियासामी, वेंकटेशन आणि प्रभू यांना तामिळनाडूतील कोंगुनाप्रम पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर कलम 109 (गुन्ह्यास प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

मुंबईत इंजेक्शन घेऊन तरुणीची आत्महत्या

दुसरीकडे, 29 वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी मुंबईत उघडकीस आली होती. इंजेक्शन घेऊन डॉ. निताशा बंगाली हिने आपलं आयुष्य संपवलं होतं. मुंबईतील वरळी भागात जून महिन्यात ही घटना घडली होती.

इंजेक्शन टोचल्याने तब्येत बिघडली

डॉ. निताशा बंगाली आपल्या आई-वडिलांसह मुंबईतील वरळी भागात राहत होती. मेडिकलचे उच्चशिक्षण घेत असलेली निताशा काही महिन्यांपासून डिप्रेशनशी झुंजत होती. त्यानंतर तिने राहत्या घरी स्वतःला इंजेक्शन टोचून घेतले. तिची तब्येत खालावत गेली. त्यानंतर तिने स्वतःच आईला याविषयी माहिती दिली.

सुसाईड नोट नाही

निताशा बंगालीला कुटुंबियांनी नायर रुग्णालयात नेले, मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. पोलिसांच्या माहितीनुसार निताशाची आईही डॉक्टर आहे, तर तिचे वडील इंजिनिअर आहेत. निताशा एमबीबीएस डॉक्टर होती, तर एमडीचे शिक्षण घेत होती. अभ्यासाबाबत निताशा तणावाखाली होती. तिच्या डिप्रेशनवर उपचारही सुरु होते, अशी माहिती समोर आली होती.

संबंधित बातम्या :

पैशांवरुन ऑफिसमध्ये भांडण, बापाने बंदुकीतून गोळी झाडली, चुकून पोटच्या पोराच्या डोक्यात घुसली

तुम्ही गपचूप झोपून रहा, अमरावतीत सहा जणांचा दरोडा, 14 लाखांचा ऐवज लुबाडला

एसटी चालकाची बसमध्येच आत्महत्या, बॅगच्या बेल्टने गळफास

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.