AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारु पिण्यावरुन हॉटेल मालकाशी वाद, दुसऱ्या दिवशी येऊन हल्ला, कर्मचाऱ्याला दोघांनी खंजीर भोसकला

पहिल्या व्यक्तीने हल्ला केल्यावर, दुसऱ्या आरोपीनेही आपला खंजीर बाहेर काढला आणि दुसऱ्या कर्मचाऱ्याला भोसकले. दरम्यान, तिसरा आरोपी हल्ला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतो तर चौथा आरोपी रेस्टॉरंटमधून बाहेर पडतो

दारु पिण्यावरुन हॉटेल मालकाशी वाद, दुसऱ्या दिवशी येऊन हल्ला, कर्मचाऱ्याला दोघांनी खंजीर भोसकला
मदुराईत हॉटेल कर्मचाऱ्यावर हल्ला
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 2:21 PM
Share

मुंबई : तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यात एका रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यावर दोघा जणांनी चाकूने असंख्य वेळा वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मदुराईच्या मुनीसलाई येथील दुर्गा रेस्टॉरंटमध्ये बुधवारी घडलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रेस्टॉरंट मालकासोबत झालेल्या वादानंतर हा हल्ला झाल्याची माहिती आहे. मदुराई पोलिसांनी या प्रकरणी चौघा जणांना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा हल्ला आदल्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे होता. वासुदेवन, वसंतन, सतीश आणि सेल्वाकुमार हे चार जण दुर्गा रेस्टॉरंटमध्ये जेवायला आले होते. त्यांनी रेस्टॉरंटमध्ये दारु पिण्यास सुरुवात केली. त्यानंतर रेस्टॉरंट मालकाने त्या चौघांना रेस्टॉरंटच्या आत मद्यपान करण्यास मनाई केली. यामुळे चौघांचा पारा चढला आणि रेस्टॉरंट मालकाशी त्यांचा वाद झाला.

व्हिडीओमध्ये काय दिसतं?

पोलिसांनी सांगितले की, हा हल्ला सुनियोजित होता. रेस्टॉरंटचा मालक अनुपस्थित असला तरी कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चार जणांपैकी एक रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताना दिसतो. आधी तो कॅश काऊंटरवर असलेल्या व्यक्तीशी बोलताना दिसतो. नंतर एका कर्मचाऱ्यावर तो लांब खंजीरीने हल्ला करतो.

पहिल्या व्यक्तीने हल्ला केल्यावर, दुसऱ्या आरोपीनेही आपला खंजीर बाहेर काढला आणि दुसऱ्या कर्मचाऱ्याला भोसकले. दरम्यान, तिसरा आरोपी हल्ला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतो तर चौथा आरोपी रेस्टॉरंटमधून बाहेर पडतो. कॅश काऊंटरवर असलेली एक महिला आणि पुरुष पळून जाताना दिसतात.

चार आरोपींना अटक

ज्या कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला त्याचे नाव मुनीश्वरन आहे. त्याला गंभीर दुखापत झाली आहे आणि त्याला मदुराईच्या शासकीय राजाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे आणि त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (खुनाचा प्रयत्न) आणि शस्त्र कायद्याच्या इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

पत्नीसोबत वादानंतर पतीची आत्महत्या, घाटात झाडाला गळफास, पुण्यात खळबळ

नेव्हीतील पतीविरोधात पोलिसात तक्रार, 24 तासात पत्नीची ‘आत्महत्या’, वडील म्हणतात, तिच्या मानेवर पाय ठेवून…

आधी बोट कापलं, आता गळा कापू, ठाण्यात फेरीवाल्याची अतिक्रमणविरोधी कर्मचाऱ्याला धमकी

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.