अल्पवयीन ट्रान्सजेंडरने केली आत्महत्या, शाळेत स्कर्टवरून झाला होता अपमान; Video Viral
शाळेमध्ये स्कर्ट (wearing skirt) घालून आल्यामुळे शाळा प्रशासनाने अपमान केल्याने 17 वर्षाच्या ट्रान्सजेंडरने (transgender) आत्महत्या केली आहे.
नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पुन्हा एकदा LGBTQ कम्युनिटी विरोधात भेदभाव करून त्रास दिल्याचं समोर आलं. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेमध्ये स्कर्ट (wearing skirt) घालून आल्यामुळे शाळा प्रशासनाने अपमान केल्याने 17 वर्षाच्या ट्रान्सजेंडरने (transgender) आत्महत्या केली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वा तिने सोशल मीडियावर (Social Media) एक व्हीडिओ शेअर केला होता. त्यामध्ये एक सल्लागार कपड्यांवरून तिला ओरडताना दिसत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (teen transgender commits suicide in france viral video of school counsellor humiliating her for wearing skirt)
मिळालेल्या माहितीनुसार, एवरिल असं पीडितेचं नाव आहे. व्हीडिओमध्ये तुम्ही पाहू शकता शाळेमध्ये कोणीही तिला मदत करत नसल्याचं दिसत आहे. तिच्या वर्गमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एवरिलने वारंवार होणाऱ्या अपमानाला कंटाळून अखेर हे सर्व सगळ्यांसमोर आणण्याचा विचार केला. त्यानंतर तिने याचा व्हीडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला. तिचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे.
Cette lycéenne trans s’est suicidée. elle avait à peine 17 ans. Elle c’était faite viré à cause de sa tenue car elle portait une jupe. C’est actes son inadmissible et ne peut pas rester dans le silence. (voici une vidéo qu’elle avait faite au bureau du CPE)#JusticePourFouad pic.twitter.com/0yzBCGgbbo
— JUSTINE (@JustineBmnn) December 17, 2020
‘मला नाही तर इतरांना शिक्षित होण्याची गरज’
एवरिलला तिच्या स्कर्टमुळे तिच्या शिक्षकाने बोलावलं. व्हीडिओमध्ये फ्रेंच भाषेत त्यांनी तिला ओरडा दिला. पण यावर माझ्यामुळे तुम्हाला काय त्रास आहे. मला नाही तर इतरांना शिक्षित होण्याची गरज असल्याचं एवरिलने म्हटलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी रडत-रडत ती उत्तर देत आहे.
या संभाषणानंतर एवरिलला घरी जाण्यास सांगण्यात आलं. इतकंच नाही तर, मुलासारखे कपडे घातल्याशिवाय शाळेत येऊ नको असंही सांगण्यात आलं. पण यानंतर एवरिलने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आत्महत्येच्या दोन दिवसानंतर, शाळा प्रशासनाने एक निवेदन जारी करत एवरिल लैंगिक ओळख बदलू इच्छित होती. असं त्यांनी सांगितलं. या घटनेनंतर एवरिलचे वर्गमित्र आणि फ्रेंच नागरिक रस्त्यावर उतरले आणि तिच्या न्यायासाठी मागणी करत शोक व्यक्त करण्यात आला. तर प्रशासनाविरोधातही संतापही व्यक्त करण्यात आला.
इतर बातम्या –
रक्ताच्या थारोळ्यातील तरुणीच्या कुटुंबीयांना तीन शब्दांवरुन शोधलं, कल्याण पोलिसांची कमाल
(teen transgender commits suicide in france viral video of school counsellor humiliating her for wearing skirt)