AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखाची निर्घृण हत्या, चंद्रपुरात खळबळ

चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात आरोपींकडून युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची हत्या करण्यात आली आहे.

ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखाची निर्घृण हत्या, चंद्रपुरात खळबळ
| Updated on: Jan 25, 2024 | 11:33 PM
Share

निलेश डाहाट, Tv9 मराठी, चंद्रपूर | 25 जानेवारी 2024 : चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात आरोपींकडून युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांची हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटना ही चंद्रपुरातील उच्चभ्रू सरकारनगर भागात घडली आहे. 30 वर्षीय शिवा वझरकर यांचा मृतदेह त्यांच्याच एका मित्राच्या कार्यालयापाशी सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येच्या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे.

शिवा वझरकर यांच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि इतर वाहनांची तोडफोड केली आहे. पोलीस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असताना झालेल्या या हत्येनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढ करण्यात आली आहे. हत्येच्या घटनेनंतर वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. वझरकर यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शव चिकित्सा कक्षात पाठवण्यात आला आहे.

शिवा वझरकर यांच्या हत्येनंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येत घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मित्रांसोबत झालेल्या वादाचे हत्येत पर्यवसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस कामाला लागले आहेत. ठाकरे गटाकडून आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.