दुचाकी स्लीप होऊन चालक कंटेनरच्या चाकात अडकला; मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

अपघात इतका भीषण होता की, पोलिसांनाही ते दृष्य पाहून अक्षरशः धडकी भरली. त्यामुळे कुठेही जायची घाई करू नका. वाहने सावकाश चालवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दुचाकी स्लीप होऊन चालक कंटेनरच्या चाकात अडकला; मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात
सांकेतिक फोटो.
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 2:05 PM

शैलेश पुरोहित, इगतपुरीः वाहने सावकाश चालवा. घरी आपली कोणीतरी वाट पहात आहे…असे रस्त्यावर लागलेले फलक आपण पाहतो. मात्र, त्यातून कोणीच बोध घेत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण काही केल्या थांबायला तयार नाही. मुंबई – नाशिक (Mumbai-Nashik) महामार्गावर (Highway) एका भीषण अपघातात (Accident) मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झालाय. हा मोटारसायकलस्वार नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात होता. त्याने जुना कसारा घाट चढला. त्यानंतर अपघात झाला. मृताचे शव रुग्णवाहिकेद्वारे इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. मात्र, अपघात इतका भीषण होता की, पोलिसांनाही ते दृष्य पाहून अक्षरशः धडकी भरली. त्यामुळे कुठेही जायची घाई करू नका. वाहने सावकाश चालवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कसा झाला अपघात?

दुचाकीस्वार नाशिकहून मुंबईकडे चालला होतात. त्याने मुंबई – नाशिक महामार्गावरचा जुना कसारा घाट चढला. मात्र, तेथील वळणारवर दुचाकीस्वाराचा ताबा सुटला. त्यामुळे मोटारसायकल (MH04,KM4864) स्पील झाली. ती समोरच्या कंटेनरला (MH46,AF2269 मागून जाऊन धडकली. या धडकेत दुचाकीस्वार कंटरेनरच्या मागील चाकात अडकला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी समजताच महामार्ग पोलिस व रूट पेट्रोलिंग टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृत व्यक्तीचे शव रुग्णवाहिकेद्वारे इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.

महिन्यात 9 दुचाकीस्वारांचा मृत्यू

नाशिकमध्ये ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल मोहीम सुरू केली. त्यानंतर त्यांचे समुपदेशन केले. परीक्षा घेतली. कार्यालयात हेल्मेटसक्ती करायचे आदेश दिले. हेल्मेटसक्ती न करणाऱ्या कार्यालयाच्या प्रमुखांना दंड ठोठावले. मात्र, अजूनही नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती यशस्वी झाली नाही. पोलीस आयुक्ताच्या कार्यालयाबाहेर मात्र, हेल्मेट नसेल, तर प्रवेश नाही, हा फलक पाहायला मिळतो.

भीषण अपघात सत्र

– नाशिकमध्ये गेल्या वर्षी 2021 मध्ये 116 दुचाकी अपघात.

– या अपघातामध्ये तब्बल 124 जणांचा झाला मृत्यू.

– मृतातील 111 जणांनी हेल्मेट घातलेले नव्हते.

– ऑगस्ट महिन्यात 9 जणांचा मृत्यू.

– ऑगस्टपासून हेल्मेटसक्ती सुरू.

– नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान विशेष अभियान.

– 10 हजार 561 दुचाकीस्वारांचे समुपदेशन.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.